मुंबई - मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भोंग्यांच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी महागाई विरोधात बोलण्याचा सल्ला मनसेला ( MNS Vs Shiv Sena ) देत डिवचले. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे ( MNS Leader Sandeep Deshpande criticized Shiv Sena ) यांनी संताप व्यक्त केला. संदिप देशपांडेच्या विधानाचा समाचार घेत, मनसेची भूमिका दर चार वर्षांनी बदलते. रंग बदलणे, झेंडे बदलण्याच्या सवयीमुळे लोकांचा त्यांच्यावर आता विश्वास नाही, असा टोला शिवसेना नेत्या मनीषा कायंदे ( Shiv Sena leader Manisha Kayande criticized MNS ) यांनी लगावला. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केलेल्या सत्तेत पैसे खाण्यासाठी बसला आहात का, असे वक्तव्य केले होते. त्याचा कायंदे यांनी चांगलाच समाचार घेतला.
'दर चार वर्षांनी भूमिका बदलते' : शिवसेना नेता संदीप देशपांडे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. जे कुठेच नाहीत, त्यांच्याबद्दल काय बोलावे, असा चिमटा कायंदे यांनी काढला. युवासेना, शिवसेनेने महाराष्ट्रात महागाई विरोधात थाळी नाद केला, हे दिसले नाही का.? वसुली, कमिशन हा कांगावा सुरू केला आहे. असे म्हटले की, लोकांना खरे वाटेल असे त्यांना वाटते. परंतु, मनसेचे नेते लोकांसमोर उघडे पडले आहेत. दर चार वर्षांनी पक्ष भूमिका बदलते, हे आता लोकांनाही माहिती झाले आहे. रंग बदलणे, झेंडा बदलणे त्यांचे सुरूच असल्याने त्यांच्यावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. महाराष्ट्रात जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम मनसेमार्फत सुरू असल्याचा आरोपही कायंदे यांनी केला. त्यामुळे आगामी काळात शिवसेना विरुद्ध मनसे असे शाब्दिक युद्ध रंगणार आहे.