मुंबई -हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि मनसेमध्ये जुंपली आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी मनसेने अयोध्येला जाण्याची घोषणा केल्याने हा वाद अधिकच चिघळला आहे. शिवसेना प्रवक्त्या दीपाली सय्यद यांच्याकडून सातत्याने राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. आज ( गुरुवारी ) अयोध्या दौऱ्यावरून ( MNS chief Raj Thackeray Ayodhya Tour ) शिवसेना नेत्या दीपाली सय्यदयांनी ( Shiv Sena leader Deepali Syed criticized MNS ) पुन्हा मनसेला डिवचले आहे. पुस्तके वाचून मत वाढत नाहीत. रेल्वेची बोगी बुकिंग करून पक्ष वाढत नाही. लांबचा पल्ला आहे. शिलेदारांचा विमा काढून जा, भाषणाने लोकांची पोट भरत नाही. महाराष्ट्राचे लेकर आहेत. सुखरूप घेऊन जा सुखरूप घेऊन या, जय श्रीराम, अशा शब्दांत दीपाली सय्यद यांनी मनसेला डिवचले आहे.
राज्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. मनसेने मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसाचा मुद्दा उपस्थित करत हिंदुत्वाचा नारा देत, येत्या पाच जूनला जाणार असल्याची घोषणा केली आहे. मनसेच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा असला तरी भाजपाचे खासदार बृजभूषण यांनी राज यांना विरोध दर्शवला आहे. तसेच उत्तर भारतीयांची माफी मागण्यासाठी दबाव टाकला जातो आहे. एकीकडे विरोध होत असताना दुसरीकडे शिवसेनेकडून मात्र मनसेवर जोरदार टीकास्त्र सुरू आहेत. अयोध्याला जाण्यासाठी भीती वाटत असेल, तर आदित्य ठाकरेंसोबत जा, असा सल्ला शिवसेना प्रवक्त्या दीपाली सय्यद यांनी दिला होता. आता अयोध्या दौऱ्यासाठी मनसेकडून होणाऱ्या रेल्वे बुकिंगवरून दीपाली सय्यद यांनी ट्विटरवरून निशाणा साधला आहे.