मुंबई -राज्याचे खरे मुख्यमंत्री कोण? असा सवाल पुन्हा एकदा शिवसेना आमदार आणि नेते आदित्य ठाकरे Shiv Sena MLA and leader Aditya Thackeray यांनी उपस्थित केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde हे स्वतः निर्णय घेतात का? असे म्हणत विधानभवनात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी हा सवाल Aditya Thackeray criticized state government उपस्थित केला. यासोबतच विरोधकांकडून पन्नास खोके एकदम ओके अशा प्रकारच्या घोषणा देत असताना सरकारमधील मंत्री हे खोके तुम्हाला पाहिजेत का? अशी विचारणा करत म्हणजे त्यांना खोके भेटले आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले. तसेच शिवसेनेशी बंडखोरी करत जे बाहेर पडले ते गद्दारचे आहेत. कुटुंबप्रमुख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खूपसायचे काम या आमदारांनी केले. त्यामुळे त्यांना गद्दार म्हणणार नाही तर काय म्हणणार, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
'तथाकथित हिंदुत्ववादी सरकार' :राज्यामध्ये आलेले सरकार हे तथाकथित हिंदुत्ववादी विचारांचा सरकार आहे. पुण्यामध्ये अफजलखान वधाचा देखावा दाखवण्याला परवानगी राज्य सरकारने दिली नाही. हे सरकार केवळ निर्णय घेते मात्र ते निर्णय अमलात आणले जात नाहीत. दहीहंडी संदर्भात देखील निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र तो देखील अंमलात आणलेला नाही. याबाबतचा शासन निर्णय अजून निघालेला नाही. पाच टक्के नोकरी गोविंदांना खेळाडू कोट्यातून दिली जाईल, असे राज्य सरकार सांगते. मात्र ती नोकरी कशी दिली जाईल, याबाबत काहीही स्पष्टता नाही. त्यामुळे राज्य सरकार केवळ निर्णय घेते. मात्र त्याची अंमलबजावणी बाबत कोणतेही धोरण आखले जात नाही, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली आहे.