मुंबई -दगाबाजी करतात ते कधी जिंकत नाहीत, त्यांच्यात हिंमत असेल तर माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलावे, असे आव्हान मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना केले. ( Shiv sena Leader Aaditya Thackeray On Rebel MLA ) शिवसेनेत माजलेल्या बंडाळीनंतर मंत्री आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. मुंबई महाराष्ट्र महानगर प्रदेशात आदित्य ठाकरे यांचे मेळाव्याचे सत्र सुरू झाले आहे. आज वरळी येथील बीडीडी चाळी येथील आयोजित कार्यक्रमात ही आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल केला. मोठ्या संख्येने शिवसैनिक येथे उपस्थित होते.
जे इथून पळून गेले आणि स्वतःला बंडखोर म्हणवून घेत आहेत, त्यांना बंड करायचे असेल तर त्यांनी इथे करायला हवे होते. त्यांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवायला हवी होती, माझ्या समोर जेव्हा ते बसतील, माझ्या डोळ्यात बघतील आणि सांगतील आम्ही काय चूक केली, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. ( Shiv sena Leader Aaditya Thackeray On Rebel MLA )
आमचे काय चुकले ते सांगावे - बीबीडीमध्ये आम्ही पोलीस कर्मचाऱ्यांना परवडणारी घरांच्या वाटप करण्यात आला आहे. हाच मोठा निकाल आहे. सर्वोच निकाल आला आहे. याबाबत माहिती घेऊन बोलतो. फोल्ड टेस्ट पेक्षा त्यांनी यावे आणि आमचे काय चुकले ते सांगावे. आम्ही फ्लोअर टेस्ट साठी तयार आहोत. तेथील काही लोक आमच्या संपर्कात आहेत. असे यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
महाराष्ट्रात सध्या राजकारण नाही, आता सर्कस झाली - वरळी येथील एका कार्यक्रमात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी वरळीकरांना आपण नेहमी असेच बोलत रहा. तुम्ही मात्र वरळी सोडून जाऊ नका असे म्हणत बंडखोर आमदार आमदारांना टोला लगावला. संजय राऊत यांना ईडीचे समन्स बजावले आहे, याबाबत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या राजकारण नाही, आता सर्कस झाली आहे.
बीडीडी पोलिसांच्या घरांच्या कार्यक्रमात बंडखोरांवर टीका - एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत ५० आमदारांसहित आसाममध्ये ठाण मांडून आहेत. शिवसेनेतील बंडखोरीमुळे शिवसैनिक आक्रमक झाला असून बंडखोरी विरोधात जोरदार निदर्शने, आंदोलने आणि तोडफोड सुरू आहे. दुसरीकडे मंत्री आदित्य ठाकरे रस्त्यावर उतरले असून मुंबई उपनगर पिंजून काढत आहेत. दरम्यानच्या, होणाऱ्या मेळाव्यात बंडखोरांना थेट इशारा देत आहोत. आज वरळी येथील बीडीडी पोलिसांच्या घरांच्या कार्यक्रमात बंडखोरांवर टीका केली.