मुंबई -शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने पाठवलेली नोटीस आणि विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य निवडण्यासाठी पाठवलेल्या 12 जणांच्या यादीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्याप निर्णय न घेतल्याने शिवसेनेत संतापाचे वातावरण आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखात भाजपावर हल्लाबोल केला आहे.' ईडी ' वगैरेचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार पाडता येईल या अंधश्रद्धेतून आता बाहेर पडले पाहिजे. हवाबाण थेरपीचा अतिरेक झाला की मेंदूत सडकी हवा जाते. त्या पादऱ्या हवेच्या ढेकरा सध्या ज्यांना लागत आहे. तो भाजप आहे, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून केली आहे. डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण हेच भाजपचं भविष्य आहे, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
भाजपविरोधकांना नमविण्याचे प्रयोग -
महाराष्ट्रातून भाजपची इडा-पीडा गेल्यापासून हे 'ईडी' प्रकरण जोर धरू लागले आहे. म्हणजे ईडीचा वापर करून भाजपविरोधकांना नमविण्याचे प्रयोग सुरू झाले आहेत. याच वातावरणाचा लाभ घेत ईडीस घाबरून भाजपच्या कळपात शिरलेल्या एका 'महात्म्या'ने 'ठाकरे सरकार' पाडण्याचा नवा मुहूर्त दिला आहे. आता म्हणे मार्च महिन्यात काही झाले तरी सरकार पडणार! हा मुहूर्त यांनी 'ईडी पिडी'च्या पंचांगातून काढला की त्यांना झोपेत दृष्टांत झाला? असा सवाल शिवसेनेने केला आहे.
घटना कोणाला शिकवता?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता घटनेचा प्रश्न उपस्थित करीत सांगितले की, 'ईडी वगैरे संस्था या बिगर राजकीय असून त्या घटनेशी बांधील आहेत. त्यामुळे संजय राऊत वगैरे लोकांना घटना मान्य नाही का? 'पाटलांना घटनेची इतकी फिकीर कधीपासून लागून राहिली? तुम्हाला घटना मान्य नाही काय, हा प्रश्न त्यांनी राजभवनाच्या दारात उभे राहून जोरात विचारायला हवा व त्यावर आपले राज्यपाल महोदय काय सांगतात ते महाराष्ट्राच्या जनतेला कळवायला हवे. घटनेची सगळय़ात जास्त पायमल्ली सध्या कुठे होत असेल तर ती घटनेच्या तथाकथित रखवालदाराकडून. मागच्या जून महिन्यात राज्यपालनियुक्त 12 जागा रिकाम्या झाल्या. त्या जागांची शिफारस राज्याच्या मंत्रिमंडळाने केली. राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारशी मान्य करणे हे राज्यपालांना बंधनकारक असल्याचे आपली घटनाच सांगते. मग इतके महिने उलटून गेले तरी राज्यपालनियुक्त जागा रिकाम्या का ठेवल्या? असा सवाल अग्रलेखातून करण्यात आला आहे.
'त्वाड्डा कुत्ता टॉमी, साड्डा कुत्ता, कुत्ता?'