मुंबई -आज गुरु पौर्णिमा. राजकीय दृष्ट्या शिवसेनेमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. दरवर्षी गुरु पौर्णिमेला अनेक शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करत असतात. दरवर्षी गुरुपौर्णिमेला हजारो शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन करतात तर काहीजण मातोश्रीलाच मंदिर म्हणून गुरुपौर्णिमेनिमित्त मातोश्री गाठतात. मात्र, पहिल्यांदाच शिवसेनेत एवढी मोठी फूट पडल्याने जवळपास अर्धा पक्ष रिकामा झालेला असताना शिवसेनेच्या या गुरुपौर्णिमेत नेमकं काय बदल झाला त्याचा घेतलेला हा आढावा.
गुरुपौर्णिमा आणि शिवसेना :शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे हे दोनही तसेच समानार्थी शब्द. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाचा आणि त्यांच्या मुंबईतील अस्तित्वाचा प्रश्न वारंवार उपस्थित केला होता. 'उठाव लुंगी बजाव पुंगी' अशा त्यांच्या घोषणा आज देखील अजरामर आहेत. इतकच नाही तर 1992-93 च्या हिंदू मुस्लिम दंगलीत शिवसेनेने घेतलेली भूमिका देखील निर्णायक राहिली आहे. यानंतर बाळासाहेबांचं महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान वाढतच गेलं. त्यांनी घेतलेल्या भूमिकांमुळे मुंबईसह महाराष्ट्रात त्यांचा चाहता वर्ग वाढू लागला. हे चाहते बाळासाहेबांना गुरुस्थानी मानत. बाळासाहेब हयात असताना हजारो शिवसैनिक ठाकरे कुटुंबियांचे निवासन असलेल्या मातोश्रीला मंदिर मानून त्यांना अभिवादन करण्यासाठी मातोश्रीवर येत. मात्र, बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसैनिकांना मातोश्री व दादरच्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेब यांचं स्मृतिस्थळ अशी दोन ठिकाण तयार झाली.
अर्ध्याहून अधिक पक्ष रिकामा :शिवसेनेच्या जवळपास 56 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकं मोठं बंड झालं. स्वतःला कट्टर शिवसैनिक व बाळासाहेबांचे कडवट भक्त म्हणून घेणारे एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील यांच्यासह जवळपास 50 आमदारांनी ब बंडखोरी केली. आणि, अर्ध्यापेक्षा अर्ध्याहून अधिक शिवसेना रिकामी झाली. आजच्या घडीला शिवसेनेतच दोन गट आहेत. एक म्हणजे एकनाथ शिंदे दुसरा म्हणजे उद्धव ठाकरे यांचा. एकनाथ शिंदे गट हा आपणच ओरिजनल बाळासाबांची शिवसेना असल्याचा दावा करतोय. त्यामुळे या राजकारणाचा देखील आजच्या गुरुपौर्णिमेवर परिणाम झालेला पाहायला मिळाला.