मुंबई -मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या ( BMC Elections ) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाने तयारी सुरू केली आहे. खास करून भारतीय जनता पक्षाने ( Bharatiya Janata Party ) मुंबई महानगरपालिकेवर आपले सत्ता आणण्यासाठी वेगवेगळ्या रणानित्या आखायला सुरुवातही केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने देखील आपली कंबर कसली असून, आज मुंबईत शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा पार पडणार आहे. सायंकाळी सात वाजता गोरेगाव येथील नेस्को संकुल येथे हा मेळावा ( Shiv Sena gathering at Nesco complex ) पार पडणार असून, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर घेण्यात येणारा हा मेळावा शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.
Shiv Sena Gathering: मुंबईत शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा, उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर आज कोण? - Gathering of Shiv Sena leaders in Mumbai
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या ( BMC Elections ) पार्श्वभूमीवर आज मुंबईत शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा पार पडणार आहे. सायंकाळी सात वाजता गोरेगाव येथील नेस्को संकुल येथे हा मेळावा ( Shiv Sena gathering at Nesco complex ) पार पडणार आहे.
ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष - त्या मेळाव्यातून उद्धव ठाकरे गटप्रमुखांना संबोधन करणार आहेत. त्यामुळे सध्याची राजकीय परिस्थिती, शिवसेनेचे सुरू असलेली राजकीय कोंडी, पक्ष फुटी बाबत उद्धव ठाकरे आज नेमकं काय म्हणणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष असणार आहे. दसऱ्याला दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा ( Shiv Sena Dussehra gathering ) पार पडत असतो. गेली अनेक वर्ष या ठिकाणी शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडण्याची परंपरा आहे.
दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच - मात्र, शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटी नंतर या परंपरेत खंड पडणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे. कारण एकनाथ शिंदे गटाकडून देखील दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर घेण्याबाबत हालचाली अद्यापही सुरू आहेत. यातच महानगरपालिकेकडून शिवसेनेला अद्यापही दसरा मेळावा घेण्यासाठी शिवाजी पार्क मैदानावर परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, परवानगी मिळो किंवा न मिळो दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानावर घेण्यावर शिवसैनिक ठाम आहेत. त्यामुळे या सर्व मुद्द्यावरही उद्धव ठाकरे गटप्रमुखांच्या मेळाव्यात काय म्हणणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.