पुणे - सध्या गेल्या काही दिवसांपासून राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा दौरा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. आता या दौऱ्याबाबत शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे गणेशोत्सवाच्या काळात पुणे दौऱ्यावर असणार आहेत, याबाबत गोऱ्हे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत सगळी माहिती दिली जाणार आहे. Neelam Gorhe आदित्य ठाकरे यांचा दौरा हा घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर नसणार आहे. काळजी करू नका अस म्हणत गोऱ्हे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना टोला लगावला आहे.
राजकीय समीकरण हे सध्या खूप बदलत चालली आहे आरोग्य मंत्री तान्हाजी सावंत यांच्या दौऱ्याबाबत विचारलं असता ते म्हणाले की तुम्ही एखाद पथक घेऊन घर आणि कार्यालय इथ कोण कोण जात हे पहा. काही ठिकाणी या गुप्त बैठका सुरू आहे की काय किंवा तिथं इथून तिथ जायला काही बोगदा आहे की काय हे बघा. काहीतरी कारण असेल म्हणून तर घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर दौरा आहे अस म्हणत गोऱ्हे यांनी सावंत यांना टोला लगावला आहे. Shiv Sena deputy leader Neelam Gorhe संभाजी ब्रिगेड बरोबर युतीबाबत विचारलं असता गोऱ्हे म्हणाले की राजकीय समीकरण हे सध्या खूप बदलत चालली आहे. त्यामुळे आपण कुठल्या बाजूने जाव याचा निर्णय हे बरेचशे लोक घ्यायला लागले आहे. उद्धव ठाकरे यांची दिशा ही खात्रीशीर वाटली म्हणून संभाजी ब्रिगेडने युती केली असे यावेळी गोऱ्हे म्हणाल्या आहेत.