मुंबई -मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील शिवसेना भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. शनिवारी सकाळी दहिसर पूर्वेकडील वॉर्ड क्रमांक 3 मधील धाराखाडी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या शौचालयाच्या उद्घाटनाच श्रेय लाटण्यावरून शिवसेना भाजपचे आमदार व कार्यकर्ते यांच्यात पुन्हा जुंपली.
शौचालयाच्या उद्घाटनावरून शिवसेना-भाजपमध्ये जुंपली, श्रेयवाद लाटण्याचा प्रयत्न - अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर
शिवसेना नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद, शाखाप्रमुख प्रकाश पुजारी व शिवसेना याला कार्यकर्त्यांनी याला विरोध करत शौचालयाभोवती घेराव घालून घोषणाबाजी केली. यावेळी आमदार प्रवीण दरेकर व प्रकाश सुर्वे दोघेही उपस्थित होते. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे राहिल्यामुळे अखेर यात दहिसर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.
दहिसर पूर्वेकडील धाराखाडी परिसर वनखात्याच्या अंतर्गत येतो. या परिसरात असलेल्या नागरी वस्तीसाठी पालिकेच्या फंडातून वन प्लस वन असे 10 शौचालय स्थानिक नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी बांधून घेतली आहेत. शिवसेनेच्या वतीने दुपारी 3 वाजता नियोजित उद्घाटन सोहळ्यापूर्वीच सकाळी 10 वाजता विधानपरिषदेचे भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी नारळ फोडत शौचालयाचे उद्घाटन करण्याचा घाट घातला.
शिवसेना नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद, शाखाप्रमुख प्रकाश पुजारी व शिवसेना याला कार्यकर्त्यांनी याला विरोध करत शौचालयाभोवती घेराव घालून घोषणाबाजी केली. यावेळी आमदार प्रवीण दरेकर व प्रकाश सुर्वे दोघेही उपस्थित होते. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे राहिल्यामुळे अखेर यात दहिसर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. पोलिसांनी यात हस्तक्षेप करत परवानगी घेऊन या मग उद्घाटन करा, असे सांगितले यामुळे वातावरण निवळले.