मुंबई- शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोषित केल्याप्रमाने ते सहकुटुंब अयोध्येला पोहोचले आहेत. पहाटे मुंबई विमानतळावरून त्यांनी अयोध्येला उड्डाण केले. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत उपस्थित होते. फैजाबाद विमानतळावर उतरल्यावर त्यांचे शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि खासदार विनायक राऊत यांनीही गुलाब पुष्प देऊन ठाकरे यांचे स्वागत केले. त्यानंतर ठाकरे यांचा ताफा आयोद्धेकडे रवाना झाला.
LIVE :
- राम मंदिरासाठी आता संसदेतून अध्यादेश काढावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
- राम मंदिर व्हावे ही सर्व हिंदूंची इच्छा आहे, म्हणूनच पुन्हा एकदा मित्रपक्षांना बहुमताने लोकांनी निवडून दिले आहे.
- उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मंदिर तो हो के रहेगाचा नारा अयोध्येत दिला.
- उद्धव ठाकरेंची अयोध्येत पत्रकार परिषद सुरू
- उद्धव ठाकरेंनी घेतले राम लल्लाचे दर्शन
- शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब अयोध्येत दाखल
'पहले मंदिर, फिर सरकार...' अशी घोषणा देत मागील वर्षी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारी शिवसेना पुन्हा एकदा अयोध्यावारीसाठी सज्ज झाली आहे. नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात मतभेद तीव्र झाल्याने शिवसेनेने राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी उद्धव यांनी प्रथमच अयोध्या दौरा केला होता. 'पहले मंदिर फिर सरकार' ही शिवसेनेची घोषणा त्यावेळी देशभर गाजली. मात्र, मंदिराआधीच केंद्रात सरकार बनले आणि शिवसेना १८ खासदारांसह त्यात सहभागीदेखील झाली. नव्या सरकारमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेच्या वाट्याला दुय्यम खाते आले आहे.