मुंबई -शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज ( बुधवारी ) 62 वाढदिवस मोठ्या उत्साहात मातोश्रीवर शिवसैनिकांकडून साजरा केला. यावेळी राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत दाखल झाले. सकाळपासूनच मातोश्रीच्या बाहेर शिवसैनिकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच थेट सर्वसामान्य शिवसैनिकांना भेटणार होते. त्यामुळे राज्यभरातून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज मातोश्रीवर हजर झाले. मात्र वाढदिवसाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटांचा ( Eknath Shinde group ) शिवसैनिकांना भेटण्याचा आरोपही खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. उद्धव ठाकरे शेकडो शिवसैनिकांना ( Uddhav Thackeray birthday meet Shiv Sainik) थेट भेटले आहेत. त्यांच्या शुभेच्छा स्वतः मातोश्रीवर उद्धव ठाकरे स्वीकारत होते. तर दुसरीकडे यापूर्वी ते शिवसैनिकांमध्ये फार मिसळताना आढळून आले नाही. त्यामुळे शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरेंचा या सगळा प्रयत्न डॅमेज कंट्रोलसाठी तर नाही? अशी चर्चा सध्या रंगली आहे.
शिवसेनेतून एकनाथ शिंदे गट बाहेर पडताना सातत्याने सर्व आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर वेळ देत नसल्याचा आरोप केला आहे. पक्षाचे आमदार असूनही उद्धव ठाकरे हे भेटायला वेळ देत नव्हते. आमदारांना भेट देत नसताना सर्वसामान्य शिवसैनिकांना उद्धव ठाकरे काय भेटणार असा चिमटाही सातत्याने बंडोखोर आमदारांकडून काढला जात होता. मात्र बंडखोर आमदारांचा हात आरोप आपल्या वाढदिवसा दिवशी उद्धव ठाकरे यांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी थेट आपल्या कार्यकर्त्यांशी शिवसेना भवनातून अनेक वेळा संवाद साधला. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांना भेटण्याचा योग त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी साधला असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.