मुंबई -शिवसेना कोणाची यावरून सध्या वाद न्यायप्रविष्ठ आहे. निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण गेले असून सदस्य संख्येवर निर्णय होणार आहे. त्यामुळे सदस्य नोंदणीवर सगळ्यांनी भर द्या. काहींनी त्यासाठी एजंट कामाला लावले आहेत, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांनी शिंदे गटाचाखरपूस ( Shinde group ) समाचार घेतला. तसेच शिवसैनिकांची प्रतिज्ञा पत्र एवढी झाली पाहिजे की भविष्यात शिवसेनेच्या नांदी लागण्याची कोणाची हिंमत आणि शिवसेनेचा भगवा कोणाला हिसकावू देणार नाही, असा हल्लाबोल करत रणशिंग फुंकले.
Uddhav Thackeray : भविष्यात शिवसेनेच्या नादी लागण्याची कोणाची हिंमत...; उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका - काहींनी त्यासाठी एजंट कामाला लावले
सदस्य नोंदणीवर सगळ्यांनी भर द्या. काहींनी त्यासाठी एजंट कामाला लावले आहेत, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांनी शिंदे गटाचा खरपूस ( Shinde group ) समाचार घेतला. तसेच शिवसैनिकांची प्रतिज्ञा पत्र एवढी झाली पाहिजे की भविष्यात शिवसेनेच्या नांदी लागण्याची कोणाची हिंमत आणि शिवसेनेचा भगवा कोणाला हिसकावू देणार नाही, असा हल्लाबोल करत रणशिंग फुंकले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला गळती लागली असताना दुसरीकडे इनकमिंग देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. कोकाटे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसैनिकांवर माझा विश्वास असून येथून पुढची प्रत्येक लढाई आपल्याला जिंकायची आहे आणि तेही मर्दासारखी म्हणत त्यांनी बंडखोर आमदांवर टिका केली. सध्या शिवसेना आणि शिंदे गटाकडूनही सदस्य नोंदणी सुरु आहे. शिवसेना पक्षाची नोंदणी ही थेट शिवसैनिकापर्यंत जाऊन केली जात आहे. तर काहींनी यासाठी प्रोफशनल एजंट लावल्याची टीका ठाकरे यांनी शिंदे गटावर केली. तसेच त्यांच्यापेक्षा दसपटीने सदस्य संख्या करणे गरजेचे असल्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच प्रतिज्ञा पत्र एवढी झाली पाहिजे की भविष्यात शिवसेनेच्या नादी लागण्याची कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे, असे म्हणत शिवसेनेचा भगवा कुणालाही हिसकावू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
नाशिकमध्ये १ लाखाहून अधिक सदस्य नोंदणी :शिवसेना पक्ष आपलाच हे दाखवून देण्यासाठी आता पक्षाकडून सदस्य नोंदणी सुरु आहे. एक लढाई कोर्टात तर दुसरीकडे रस्त्यावर असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सदस्य नोंदणीचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसादही मिळत आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यातून आतापर्यंत १ लाखाहून अधिकची नोंदणी झाली आहे. सदस्य नोंदणीचा फॉर्म आणि सर्वकाही सुरळीत प्रकिया करण्याचे आवाहन ठाकरे यांच्याकडून केले. पुन्हा केवळ फोटोच कसा म्हणून आपले सदस्य रद्द होऊ नये याची काळजी घेण्याची सूचनाही ठाकरेंनी केली.
हेही वाचा -Cabinet Expansion : दिल्ली वारीनंतर शिंदे-भाजप सरकारची गुड न्युज; शपथविधीसाठी मंत्र्यांची यादी तयार