मुंबई -एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांसह बंड केलं, त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावं लागलं. एकनाथ शिंदेंनी भाजपासोबत जात सत्तास्थापन करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शिवसेनेचे 12 खासदारही एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या गटात सामिल झाले. आता ठाकरे आणि शिंदे यांच्यात शिवसेना कुणाची असा वाद शिगेला गेला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांची मुलाखत घेतली आहे. त्याचा टीझर आज ( रविवारी ) संजय राऊत यांनी ट्वीट केला आहे. ही मुलाखत स्फोटक आणि खळबळजनक असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. विशेष बाब म्हणजे या मुलाखतीच्या टीझरमध्ये उद्धव ठाकरे यांनी कपाळावर जो विश्वासघाताचा शिक्का लागलाय तो पुसता येणार नाही, अशा शब्दात एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर हल्ला चढवल्याचे पाहायला मिळत आहे.
Uddhav Thackeray Interview : उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्ला; 'कपाळावर बसलेला विश्वासघाताचा शिक्का पुसता येणार नाही'
एकनाथ शिंदेंनी भाजपासोबत जात सत्तास्थापन करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शिवसेनेचे 12 खासदारही एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या गटात सामिल झाले. आता ठाकरे आणि शिंदे यांच्यात शिवसेना कुणाची असा वाद शिगेला गेला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांची मुलाखत घेतली आहे. त्याचा टीझर आज ( रविवारी ) संजय राऊत यांनी ट्वीट केला आहे.
45 सेंकदाचा टीझर : हा टीझर साधारण 45 सेंकदाचा आहे. यात संजय राऊत राज्यातील राजकीय स्थितीबाबत उद्धव ठाकरे यांनी थेट सवाल करताना दिसून येत आहे. या टीझरमध्ये संजय राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांमध्ये, धनुष्यबाण कुणाचा?, ठाकरेंना पुरावे द्यावे लागत आहेत शिवसेना खरी किंवा खोटी, शिवसेनेत फूट दिसतेय, याआधी राणे, भुजबळांनाही पाडता आली नव्हती, नेमकं काय चूकलं आपलं, महाविकास आघाडीचा प्रयोगच चुकलाय? अशा विविध प्रश्नांचा यात समावेश दिसून येत आले आहे. 26 आणि 27 जुलैला उद्धव ठाकरेंची ही मुलाखत प्रदर्शित होणार आहे.