मुंबई - शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut Takes Uddhav Thackeray Interview ) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत शिवसेनेच्या मुखपत्रातून 26 आणि 27 जुलैला प्रसारित केली जाणार आहे. या मुलाखतीतील काही व्हिडिओ खासदर संजय राऊत यांनी सोशल माध्यमांवर अपलोड केले आहेत. मात्र या व्हिडिओवरुन संजय राऊत आणि उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray Trolled In Social Media ) यांना प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. यातीलच 'सगळ्यात मोठं टेंशन होतं, डा, किवी मुंगी चावली तर खाजवायचं कसं' हा व्हिडिओ तर सोशल माध्यमात प्रचंड व्हायरल होत आहे.
सगळ्यात मोठं टेंशन 'कसं खाजवायचं' -खासदार संजय राऊत ( Sanjay Raut Takes Uddhav Thackeray Interview ) यांनी घेतलेल्या उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर सोशल माध्यमातून चांगलीच टीका होत आहे. यात संजय राऊत यांना बोलताना उद्धव ठाकरे आजारपणातील किस्सा सांगत आहेत. त्यामुळे आपण आजारी असताना बंडखोर आमदारांनी शिवसेना फोडण्याचा कट रचल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मात्र आपणाला आजारपणात काही कळत नव्हते. हातपाय बधीर असताना ते हलवताही येत नव्हते. यात सगळ्यात मोठं टेंशन होतं, मुंगी किंवा डास चावली तर खाजवायचं कसं, असे उद्धव ठाकरे बोलताना या व्हिडिओत दिसत आहे. मात्र या व्हिडिओने सोशल माध्यमात मोठी धमाल उडवली आहे.