महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sanjay Pawar RajyaSabha Candidate : शिवसेनेकडून संजय पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब; गुरुवारी भरणार उमेदवारी अर्ज - संजय राऊतांनी जाहिर केले संजय पवारांचे राज्यसभेसाठी नाव

शिवसेनेकडून कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार ( Kolhapur district chief Sanjay Pawar as Rajya Sabha candidate ) यांचे नाव राज्यसभेसाठी ( RajyaSabha ) निश्चित केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ) यांनी दिली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv sena Party chief Uddhav Thackeray ) यांची आज भेट घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Sanjay Pawar RajyaSabha Candidate
Sanjay Pawar RajyaSabha Candidate

By

Published : May 25, 2022, 5:31 PM IST

मुंबई -राज्यसभेच्या सहाव्या आणि शिवसेनेच्या दुसऱ्या जागेसाठी सेनेने कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार ( Kolhapur district chief Sanjay Pawar as Rajya Sabha candidate ) यांचे नाव निश्चित केले आहे. उद्या ( गुरुवारी ) राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ) यांनी दिली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv sena Party chief Uddhav Thackeray ) यांची आज भेट घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यामुळे शिवसेनेकडून संभाजीराजांच्या समर्थनाच्या आशा पूर्णपणे मावळल्या आहेत.



'आम्ही छत्रपती घराण्याचा मान राखला, पण...' :राज्यसभेच्या दोन्ही जागा जिंकण्यासाठी शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ आहे. गुरुवारी संजय राऊत आणि संजय पवार राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरतील. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित असतील. संभाजीराजेंना उमेदवारी देण्यास शिवसेना तयार होती. ४२ मतांचे आमच्याकडे मत होती. परंतु, ते इच्छुक नसल्याने आमची मते अपक्ष उमेदवाराला कशी देणार, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. तसेच छत्रपतींच्या घराण्याचा सन्मान होत नसल्याचा आरोपाला ही त्यांनी सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले की, शिवसेनेच्या कोट्यातील एक जागा संभाजीराजेंना द्यायला तयार झालो. छत्रपतींच्या घराण्याचा याहून अधिक कोणत्या सन्मान शिवसेनेने करायला हवा हे सांगा, असेही राऊत म्हणाले. छत्रपतीना राजकीय पक्षाचे वावडे असण्याचे कारण नाही. मालोजीराजे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. तर संभाजीराजे स्वतः राष्ट्रवादीकडून लढले आणि पराभूत झाले. त्यामुळे छत्रपती घराण्यातील व्यक्ती राजकीय पक्षात जात नाहीत, हा दावा चुकीचा असल्याचे राऊत यांनी सांगितले.

निवडणुकीत चुरस :राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून संभाजीराजे रिंगणात उतरले होते. मात्र शिवसेनेने दुसरा उमेदवाराची घोषणा केल्याने संभाजीराजे यांची कोंडी झाली होती. संभाजीराजांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवावी, अशी अटकळ सेनेने बांधली होती. मात्र संभाजीराजांनी शिवसेनेच्या सगळ्या ऑफर धुडकावून लावत अपक्ष लढण्यावर ठाम राहिले. त्यामुळे संभाजीराजेंनी विरोधात शिवसेना दुसरा उमेदवार देण्यावर ठाम आहे. भाजपाही तिसरा आणि राज्यसभेचा सहावा उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याने या निवडणुकीत चुरस वाढली आहे.

हेही वाचा -आमची हक्काची जागा कोणालाही देणार नाही; संभाजीराजेंच्या उमेदवारीवर राऊतांची प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details