मुंबई- सर्वांचे लक्ष लागून असलेल्या बिहारनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचाही समावेश आहे. याशिवाय शिवसेना नेते सुभाष देसाई, संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, प्रियंका चतुर्वेदी, राहुल शेवाळे या महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचा स्टार प्रचारक म्हणून समावेश करण्यात आला आहे.
शिवसेनेचं ठरलं! बिहार निवडणुकीत सेनेच्या तोफा धडाडणार, "हे" आहेत स्टार प्रचारक - shevsena news
बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उतरणार असून यासाठी प्रचारकांची फौज तयार करण्यात आली आहे. बिहार निवडणुकीसाठी भाजपकडून सुशांतसिंह प्रकरणाचा वापर करण्यात आला होता. त्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत. बिहार निवडणुकीतही त्याचा आता प्रत्येय येईल.
शिवसेना
याव्यतिरिक्त राजकुमार बाफना, कृपाल तुमाणे, सुनील चिटणीस, योगराज शर्मा, कौशैलेंद्र शर्मा, विनय शुक्ला, गुलाबाचंद दुबे, अखिलेश तिवारी, अशोक तिवारी यांचा समावेश आहे. हे सर्व नेते बिहार निवडणूकीतील शिवसेनेच्या उमेदवारांचा स्टार प्रचारक म्हणून प्रचार करतील.