महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

इंधन दरवाढीविरोधात सेनेचे भाजप कार्यालयासमोर आंदोलन

शिवसेनेने थेट भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयासमोरच निषेध करणारे मोठे होर्डिंग लावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बॅनरबाजी करत शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला.

shivsena
शिवसेनेने लावलेले होर्डिंग

By

Published : May 29, 2021, 6:32 PM IST

मुंबई -आज(28 मे) पेट्रोल दरवाढ करून १०० रुपयेहून अधिक किंमतीत विकले जात आहे. त्यामुळे महागाई वाढली आहे. सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. याचाच निषेध करण्यासाठी शिवसेनेने थेट भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयासमोरच निषेध करणारे मोठे होर्डिंग लावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बॅनरबाजी करत शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. पोलिसांनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांची समजूत घातली. यावेळी तत्काळ होर्डिंग उतरवण्यात आले. पोलिसांनी 4 शिवसैनिकांना यावेळी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा -आरक्षण देण्यात कोण कमी पडले, याची संभाजीराजेंना पूर्ण कल्पना- भाजप नेते गिरीश महाजन

भाजप कार्यालयाबाहेर होर्डिंग लावत उपटांग गोष्टी करू नयेत - भाजप

दरम्यान, भाजप कार्यालयाबाहेर होर्डिंग लावत उपटांग गोष्टी कोणी करू नये, असा इशारा भाजप प्रवक्ते अतुल शहा यांनी दिला आहे. इंधनाचे दर कमी करायचे असतील तर, राज्य सरकारने टॅक्स कमी करावा, इंधन दर आपोआप कमी होतील. शिवसेनेच्या या घटनेचा निषेध भाजपकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा -झारखंडच्या हजारीबागमध्ये फरशीवर उकळतंय पाणी!

ABOUT THE AUTHOR

...view details