मुंबई -शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद (Sanjay Raut Press Conference ) घेतली. त्यानंतर त्यांनी किरीट सोमैया यांच्यावर आरोप केले, यावेळी शिवसैनिकही सोमैयांवर आक्रमक ( Shiv Sainik on Kirit Somaiya ) झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना भवन येथे मोठ्या सैनिक जमा झाले होते. यावेळी सोमैया नाहक आणि खोटे आरोप करून त्रास देत आहेत. त्यांनी आरोप करणे थांबवावे अन्यथा रस्त्यावर पकडून झोडून काढू, असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.
'...तर रस्त्यावर पकडून'
ईडीकडून छोट्या छोट्या गोष्टींचा तपास केला जातो आहे. वैयक्तिक गोष्टींचा ईडी कसा काय तपास करू शकते. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी हे प्रयत्न आहेत. हा सगळा प्रकार चुकीचा असून तो कशासाठी सुरू आहे, असा सवाल नगरसेविका समृद्धी काथे यांनी उपस्थित केला. तसेच संजय राऊत यांना पाठींबा दिल्याचे स्पष्ट केले. शिवसेना 138 च्या महिला शाखा प्रमुखांनी सोमैया विरोधात घोषणा देत, रस्त्यावर पकडून झोडण्याचा इशारा दिला. सोमैया यांनी विनाकारण आरोप करत नाहक त्रास देणे थांबवावे, असा इशाराही दिला. शिवसेनेवर सातत्याने होणाऱ्या आरोप होत आहेत.