मुंबई - राज्यातील गरीब जनतेला मोफत 'शिवभोजन' थाळीची मुदत एक महिन्यासाठी वाढवण्यात आली आहे. 15 एप्रिल 2021 पासून सुरु असलेली ही सुविधा आता 14 जुलै 2021 पर्यंत वाढवण्यात आली.
मोफत शिवभोजन थाळीला मुदतवाढ -
'ब्रेक द चेन’ याअंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब व गरजू नागरिकांसाठी मदतीचे पॅकेज घोषित केले होते. त्यामध्ये राज्यातील गरीब नागरिकांसाठी शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत एक महिन्यासाठी मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. 15 एप्रिल 2021 पासून सुरू असलेली ही सुविधा आता 14 जुलै 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन पाठवलेल्या नि:शुल्क थाळीच्या मुदतवाढीच्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.