महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ShivSena : देशभरात हातपाय पसरण्यासाठी शिवसेनेला उशीर झालाय का?

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपैकी शिवसेनेने गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये आपले उमेदवार उभे केले आहेत. मात्र, आता केवळ विधानसभा किंवा लोकसभा एवढ्याच निवडणुका नाही. तर, देशभरात शिवसेना पुढील काळात ग्रामपंचायत निवडणुका देखील लढवेल, असे संकेत शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल गोव्यात दिले. यावर शिवसेनेने देशभरात हात-पाय पसरायला उशीर ( political analysts Opinions on ShivSena ) केला असल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येतंय.

शिवसेना
ShivSena

By

Published : Feb 13, 2022, 5:03 PM IST

Updated : Feb 13, 2022, 6:04 PM IST

मुंबई -शिवसेना आता केवळ विधानसभा आणि लोकसभेत नाही तर देशभरातल्या ग्रामपंचायत निवडणुका देखील लढवणार, असे संकेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. मात्र, युतीत पंचवीस वर्ष असलेल्या शिवसेनेने देशभरात हात-पाय पसरायला उशीर केला असल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडून ( political analysts Opinions on ShivSena ) व्यक्त करण्यात येतंय.

शिवसेना खासदार संजय राऊत


पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपैकी शिवसेनेने गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये आपले उमेदवार उभे केले आहेत. मात्र, आता केवळ विधानसभा किंवा लोकसभा एवढ्याच निवडणुका नाही. तर, देशभरात शिवसेना पुढील काळात ग्रामपंचायत निवडणुका देखील लढवेल, असे संकेत शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल गोव्यात दिले. त्यामुळे येणाऱ्या काळात देशातल्या प्रत्येक निवडणुकांमध्ये शिवसेना गांभीर्याने घेणार असून देशभरात शिवसेनेचा पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे स्पष्ट संकेत आदित्य ठाकरे यांच्याकडून देण्यात आले आहेत.

भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गणेश हाके


आदित्य ठाकरे करणार यूपी दौरा -
गोव्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी आदित्य ठाकरे यांनी प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. मात्र, लवकरच आदित्य ठाकरे उत्तर प्रदेशला जातील, असे संकेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये देखील शिवसेना आपले उमेदवार उत्तर प्रदेशात रिंगणात आणणार असल्याचं संजय राऊत यांनी आताच घोषित केले आहे. आदित्य ठाकरे उत्तर प्रदेश दौऱ्यामध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख नेते अखिलेश यादव यांची भेट घेणार असल्याचे संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले. त्यामुळे या भेटीत राजकीय समीकरणाचे नवीन आयाम लावले जाणार का, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
देशात प्रसारासाठी शिवसेनेने उशीर केला -
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची 25 वर्ष युती होती. मात्र, त्या युतीमध्ये शिवसेनेची 25 वर्ष सडली, अशी वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून वेळोवेळी करण्यात आली आहे. केवळ शेंडी-जानव्याचे हिंदुत्व आमचं नाही, असा टोलाही भारतीय जनता पक्षाला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी असलेल्या भारतीय जनता पक्षाला पर्याय म्हणून शिवसेना उभी करण्याचा मानस शिवसेनेचा दिसतोय. मात्र देशभरात शिवसेनेचे जाळे पसरवण्यासाठी शिवसेनेने उशीर केला असल्याचे मतं राजकीय विश्लेषक अजय वैद्य व्यक्त करतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची धुरा सांभाळल्यानंतर लगेचच याबाबतचं पाऊल उचलले गरजेचं होतं. तसेच बाळासाहेब ठाकरे हयात असताना देशभर शिवसेना पोहचवण्याचा प्रयत्न झाला असता तर, त्याला अधिक जोरात लोकांकडून प्रतिसाद मिळाला असता. मात्र सध्याची राजकीय गणित पाहता शिवसेनेला देशभर आपले जाळे पसरवण्यासाठी बरीच कसरत करावी लागेल. तसेच भारतीय जनता पक्षाला पर्याय म्हणून शिवसेना उभी राहू शकते, या बाबतचा विश्वास जनतेत निर्माण करण्यासाठी देखील शिवसेनेला बराच कालावधी लागू शकतो. तो विश्वास निर्माण करण्यासाठी लोकांमध्ये मिसळून शिवसेनेला काम करावे लागेल. महाराष्ट्राबाहेर मोठी नेतृत्व उभी करावी लागतील. त्यानंतरच भारतीय जनता पक्षाला पर्याय म्हणून शिवसेनेकडे पाहिलं जाईल, असं मतही अजय वैद्य यांनी व्यक्त केले.
मर्यादित उद्दिष्ट असणाऱ्या पक्षाचे देशभर विस्तार होत नाही -
मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून शिवसेनेने आपली सुरुवात केली. मात्र आता जरी देशभरात आपले जाळे पसरविण्याचे काम शिवसेनेकडून होणार असलं तरी ते शक्य नाही. कारण मर्यादित स्वरूपाचे उद्दिष्ट ठेवून कोणत्याही पक्षाला देशभरात विस्तार करता येत नाही. भारतीय परंपरा भारतीय विचार आणि भारतीय संस्कृतीच्या पक्षांकडे आहे. त्याच पक्षांना देशभर विस्तार करता येतो. प्रादेशिक अस्मिता घेऊन देशांमध्ये अनेक पक्ष तयार झाले. मात्र त्या पक्षांचा देशभर कधीही विस्तार होऊ शकलेला नाही. शिवसेनेची ही परिस्थिती तशीच आहे. शिवसेनेची विचार पद्धती संकुचित असल्याने देशभरात विस्तार व्हायला शिवसेनेला वाव मिळणार नाही, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गणेश हाके यांनी व्यक्त केले आहे.


Last Updated : Feb 13, 2022, 6:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details