मुंबईशिवसेनेचा दसरा मेळावा Dussehra Gathering ShivSena दरवर्षी दादरच्या शिवाजी पार्कवर Dadar Shivaji Park लाखो शिवसैनिकांच्या उपस्थितीत पार पडतो. मात्र, यंदा राज्यातील परिस्थीती पूर्णपणे वेगळी आहे. शिवसेनेत उभी फूट Split In ShivSena पडल्याने शिवसेनेचे निम्म्याहून अधिक आमदार बंडखोर शिंदे गटात Rebel Shinde Group आहेत. अशातच, दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी शिवसेनेनं अर्ज केला आहे. मात्र, बीएमसी BMC आणि पोलिसांनी Police department अद्याप कोणतीही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे शिवाजी पार्कवर यंदा कुणाचा जय महाराष्ट्र, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा नेमकं कोण घेणार हे पालिकेच्या निर्णयावर अवलंबून आहे.
सध्या गृहखात home affairs Department उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांचे कट्टर विरोधक देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्याकडे आहे. त्यामुळे भविष्यात पालिकेच्या परवानगीनंतर Permission For Dussehra Gathering पोलिसांच्या परवानगीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागण्याची देखील दाट शक्यता आहे. त्यामुळे, दसरा मेळाव्यात माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray व आपल्या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde हे शिवाजी पार्कवर आमने-सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे यावेळी शिवाजी पार्क शिवसेनेतील उद्धव ठाकरे गट Uddhav Thackeray group आणि एकनाथ शिंदे गट Eknath Shinde group यांच्यातील राजकीय युद्धाचा आखाडा बनू शकतो. 5 ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा होणार आहे.
दसरा मेळावा आमचाच, ठाकरे शिवाजी पार्कवरच्या या दसरा मेळाव्यावरून वाद सुरू असताना आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी आमचा दसरा मेळावा Dussehra Gathering ShivSena हा शिवाजी पार्कवरच Dadar Shivaji Park होईल. मग परवानगी मिळो अथवा नाही. अशा थेट शब्दात ठणकावून सांगितलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर जमण्यास शिवसैनिकांची थोड्याच दिवसात सुरुवात होईल. त्यामुळे हा जो काही तांत्रिक मांत्रिक भाग आहे तो ते बघून घेतील. पण, आमचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होईल.