मुंबई: Shinde Group Dussehra Teaser: दसरा मेळावा शिवसेना ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही गटासाठी प्रतिष्ठेचा झाला आहे. माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena chief Uddhav Thackeray आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांच्या गटाचा मेळावा हा एकाच दिवशी होणार आहे. लाखोंनी शिवसैनिक कार्यकर्ते हे मुंबईत या मेळाव्याला येणार आहेत. प्रतिष्ठेच्या झालेल्या या दसरा मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून पहिला टीचर प्रदर्शित झाला आहे.
Shinde Group Dussehra Teaser: शिंदे गटाचा दसरा मेळाव्याचा पहिला टिझर रिलिझ, भगवी हिंदवी तोफ पुन्हा धडाडणार.. - First Teaser Release
Shinde Group Dussehra Teaser: दसरा मेळावा शिवसेना ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही गटासाठी प्रतिष्ठेचा झाला आहे. माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena chief Uddhav Thackeray आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांच्या गटाचा मेळावा हा एकाच दिवशी होणार आहे. लाखोंनी शिवसैनिक कार्यकर्ते हे मुंबईत या मेळाव्याला येणार आहेत.
कसा आहे टिझर ?शिंदे गडाकडून प्रदर्शित करण्यात आलेल्या या टिझरमध्ये शिवसेनेचे संस्थापक व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज वापरण्यात आला आहे. सोबतच त्याला बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो देखील जोडण्यात आले आहेत. टिझरच्या शेवटी भगव्या झेंड्यावर एकनाथ शिंदे यांचा तळपता फोटो लावण्यात आला आहे. सोबतच वरती डाव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो तर उजव्या बाजूला धनुष्यबाण हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह वापरण्यात आलं आहे.
गर्व से कहो हम हिंदू हैया टिझरमध्येच गर्व से कहो हम हिंदू है, भगवी हिंदवी तोफ पुन्हा धडाडणार तसंच 'एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ' अशी त्याला कॅप्शन देण्यात आली आहे. त्यामुळे बाळासाहेबांचा फोटो असेल त्यांचा आवाज असेल सोबतच शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह असेल हे सर्व आपल्या दसरा मेळाव्याच्या टिझरमध्ये वापरून कुठेतरी शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न केला असल्याच्या चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत.