मुंबई: बीकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. (shinde camp dasara melava). राज्यभरातून येणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. ये-जा करणाऱ्या मार्गावर पार्किंगमुळे रस्ते वाहतुकीचा होणारा बोजवारा टाळण्यासाठी शिंदे गटाने आजूबाजूच्या खाजगी कार्यालयांचे पार्किंग भाडे तत्त्वावर आरक्षित केले आहे. (shinde reserved parking for dasara melava). या सर्व तयारीसाठी लाखो रुपयांचा खर्च येणे अपेक्षित आहे.
Dasara Melava: शिंदे गटाची दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी, खाजगी कार्यालयांचे भाडेतत्त्वावर पार्किंग - Dasara Melava
बीकेसी मैदानात शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी राज्यभरातून सुमारे साडेतीन ते चार लाख लोक एकत्र आणली जाणार आहेत (shinde camp dasara melava). या पार्श्वभूमीवर खासगी आणि शासकीय वाहने आरक्षित करण्यासाठी शिंदे गटाने जोर लावला आहे. ये-जा करणाऱ्या मार्गावर पार्किंगमुळे रस्ते वाहतुकीचा होणारा बोजवारा टाळण्यासाठी शिंदे गटाने आजूबाजूच्या खाजगी कार्यालयांचे पार्किंग भाडे तत्त्वावर आरक्षित केले आहे. (shinde reserved parking for dasara melava).
मेळाव्याच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन: दसरा मेळाव्याच्या माध्यमातून शिंदे गटाने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्धार केला आहे. शिंदे गटाच्या प्रत्येक आमदार आणि खासदारांना हजारो कार्यकर्ते आणण्याचे टार्गेट देण्यात आले आहेत. येण्या-जाण्यासाठी बसेस किंवा अन्य वाहतुकीची साधने उपलब्ध करून देण्याच्या सूचना आहेत. या पार्श्वभूमीवर खासगी आणि शासकीय वाहने आरक्षित करण्यासाठी शिंदे गटाने जोर लावला आहे. आत्तापर्यंत सुमारे अडीच ते तीन हजार छोट्या- मोठ्या वाहनांची बुकिंग झाल्याची माहिती मिळत आहे.
पोलीसांची खबरदारी घेण्याची सूचना: बीकेसी मैदानात शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी राज्यभरातून सुमारे साडेतीन ते चार लाख लोक एकत्र आणली जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे आणि कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही तसेच शिवाजी पार्कवर जाणाऱ्या शिवसैनिकांना देखील अडथळा निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश पोलिसांनी शिंदे गटाला दिले आहेत. शिंदे गटाच्या मेळाव्या संदर्भातील नियोजनासाठी सतत बैठका होत आहेत. मेळाव्याला अजून तीन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे, तोपर्यंत सगळे नियोजन पूर्ण होईल, अशी माहिती शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी दिली आहे.