महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Shivsena Dasara Melava : शिवाजी पार्क प्रकरणात शिंदे गटाची मुंबई उच्च न्यायालयात मध्यस्थ याचिका - Petition of Shinde Group

शिवाजी पार्क प्रकरणात शिंदे गटाची ( Shinde group ) मुंबई उच्च न्यायालयात ( Bombay High Court ) मध्यस्थ याचिका स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी दाखल केली. याचिका दरवर्षीप्रमाणे आपल्याच अर्जाला परवानगी देण्याची याचिकेत मागणी याचिकेत करण्यात आली आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्या करिता आपला अर्ज पालिकेकडे गेल्याचा त्यांचा दावा आहे.

Bombay High Court
मुंबई उच्च न्यायालय

By

Published : Sep 22, 2022, 11:40 AM IST

Updated : Sep 22, 2022, 12:19 PM IST

मुंबई -शिवाजी पार्क प्रकरणात शिंदे गटाची ( Shinde group ) मुंबई उच्च न्यायालयात ( Bombay High Court ) मध्यस्थ याचिका स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी दाखल केली. याचिका दरवर्षीप्रमाणे आपल्याच अर्जाला परवानगी देण्याची याचिकेत मागणी याचिकेत करण्यात आली आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्या करिता आपला अर्ज पालिकेकडे गेल्याचा त्यांचा दावा आहे.

याचिका फेटाळण्याची मागणी -उद्धव ठाकरे यांचा गट त्यांची शिवसेना खरी असल्याचा दावा करून न्यायालयाची दिशाभूल करत असल्याचा आरोप करून अनिल देसाई यांनी केलेली याचिका फेटाळण्याची मागणी सरवणकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची शिवसेना खरी असून शिवाजी पार्कवर आम्हाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्याची मागणी यातून करण्यात आली आहे.

आज न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता -शिवसेनेकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यातच शिंदे गटाकडून आमदार सदा सरवणकर यांनी न्यायालयात मध्यस्थ याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे हा वाद आता थेट न्यायालयात पोहोचला असून त्यावर न्यायालय जो निकाल देईल, तो मान्य असेल, अशी भूमिका शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांनी जाहीर केली आहे.

Last Updated : Sep 22, 2022, 12:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details