मुंबईराज्याचे२०२२ चे पावसाळी अधिवेशन 2022 Monsoon Session आजसून विधान भवन Vidhan Bhavan Mumbai मुंबई येथे होणार आहे. दिनांक १७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. शिंदे सरकारचे पहिले अधिवेशन असताना विरोधकांच्या प्रश्नांना कसे सामोरे जातात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा आणि विधानपरिषदेतील सदस्यांनी आपल्या लक्षवेधी सूचना आणि तारांकित प्रश्न संबंधित विभागांना पाठवले होते. पण मंत्रीमंडळाचा विस्तार रखडल्यामुळे संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी या फाईल आपापल्या विभागातच ठेवल्या होत्या. गेल्या ९ ऑगस्ट रोजी मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर या अधिकाऱ्यांना हायसे वाटले होते. Monsoon Session of Shinde Govt परंतु खातेवाटप न झाल्यामुळे सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी या फाइल्स मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविल्या होत्या. त्यामध्ये सुमारे ७०० ते ७५० तारांकित प्रश्न असल्याचे समजते.
अधिवेशनापूर्वी पंधरा दिवस काम अपेक्षितअधिवेशन सुरु होण्याच्या १५ ते २० दिवस अगोदर आमदारांमार्फत संबंधित विभागांकडे लक्षवेधी सूचना आणि तारांकित प्रश्न येत असतात संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी लेखी उत्तरे दिल्यानंतर ती विधानमंडळ कार्यालयाकडे पाठवली जातात तेथे शुद्धलेखन आणि राजशिष्टाचार तपासणी करून शासकीय मुद्रणालयाकडे छपाईसाठी पाठवली जातात. त्यानंतर उत्तरांच्या छापील पुस्तकांचे सर्व आमदारांना वितरण केले जाते परंतु अद्याप एकाही प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री कार्यालयाकडून आले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सततचे दौरे बैठका आणि लोकांच्या कामांना त्यांनी थेट प्राधान्य दिल्यामुळे लक्षवेधी सूचना आणि तारांकित प्रश्नांवर उत्तरे देण्यास त्यांना वेळ मिळाला नसल्याचे बोलले जात आहे.