महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Shinde Government Ministry : शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी? दीपक केसरकर यांनी सांगितली तारीख - CM Eknath Shinde

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची ( CM Eknath Shinde ) व उपमुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. मात्र, अद्याप मंत्रिमंडळ स्थापन झालेले नाही. याबाबतची माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली आहे.

Deepak Kesarkar
दीपक केसरकर

By

Published : Jul 12, 2022, 7:47 AM IST

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 18 जुलैनंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा ( Shinde Government Ministry expansion ) निर्णय घेतील, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर ( Deepak Kesarkar on Ministry Expansion ) यांनी केला आहे. दिपक केसरकर यांनी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, 13 जुलैपूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता नाही. कारण आमचे काही आमदार आणि भाजपचे आमदार आगामी राष्ट्रपती निवडणुकीशी संबंधित बैठकीसाठी दिल्लीला जाणार आहेत.

मंत्रिमंडळ विस्तार 18 जुलैनंतर- पत्रकारांशी बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार कधी करायचा याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघं मिळून ( Maharashtra cabinet ) घेतील. सध्या महाराष्ट्रात सर्व काही सुरळीत चालेले आहे. 13 जुलैपूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता नाही. कारण आमचे काही आमदार आणि भाजपचे आमदार आगामी राष्ट्रपती निवडणुकीशी संबंधित बैठकीसाठी दिल्लीला जाणार आहेत. त्यानंतर ते मुंबई तेथे मुंबईत देखील भाजपचे व आमचे सर्व आमदार मिळून 16 तारखेला एक बैठक होईल. 17 तारखेला प्रत्यक्षात मतदान कसे केले जाते, याची माहिती दिली जाईल. 18 तारखेला मतदान होईल. त्यामुळे एवढ्या घाई गडबडीत मंत्रिमंडळ विस्तार ( President election 2022 ) शक्य नाही, अशी प्रतिक्रिया केसरकर यांनी दिली आहे.

ती केवळ राजकीय रणनिती-उद्धव ठाकरे यांच्या सोबत उरलेल्या आमदारांकडून व उद्धव ठाकरे यांनी देखील बंडखोर आमदारांना निवडणुकीला सामोरे जाण्याचे आव्हान दिले होते. यावर देखील केसरकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावर बोलताना ते म्हणाले की, ही केवळ उद्धव गटाची राजकीय रणनीती आहे. महाराष्ट्र विधानसभेत आमचे बहुमत आहे. ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांनी नुकतेच महाराष्ट्रात सरकार स्थापन केले आहे, असे मत केसरकर यांनी व्यक्त केले.

धनुष्यबाण चिन्ह कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही-दरम्यान, माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका घेण्याची मागणी केली होती. यावेळी त्यांनी आपल्या पक्षाचे (शिवसेना) ‘धनुष्यबाण’ चिन्ह कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही, असेही ते म्हणाले होते. मध्यावधी निवडणुकीत लोकांनी त्यांच्या पक्षाला पसंती दिली नाही, तर तो निर्णय स्वीकारू, असे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.

शिंदे सरकारला बहुमत -3 व 4 जुलै रोजी राज्यपालांनी बोलाविलेल्या विशेष अधिवेशनात 3 जुलै रोजी अध्यक्षपदाची निवडणूक झाली. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी बहुमताने निवडून आले. त्यानंतर 4 जुलै रोजी शिंदे सरकारची बहुमत चाचणी घेण्यात आली. यामध्ये शिंदे सरकारने 164 विरुद्ध 99 अशा मतांनी बाजी मारत बहुमत सिद्ध केली. तेव्हापासून शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार याबाबतीत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. मात्र, 11 जुलैला सरकारचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीदरम्यान ठरणार असल्याने शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्तार केलेला नाही.

किती जणांची लागणार वर्णी -मंत्रिमंडळ विस्तारात किती जणांची आणि कोणाची वर्णी लागणार यावर आता अटकळ बांधली जाऊ लागली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात 13 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये शिंदे गटाच्या वाटेला 5 मंत्रीपदे जाऊ शकतात. तर या सरकारमध्ये मोठा गट असलेल्या भारतीय जनता पक्षाकडे 8 मंत्रीपदे पहिल्या टप्प्यात जाऊ शकतात.

हेही वाचा-Deepak Kesarkar : किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंबद्दलचे 'ते' ट्विट दीपक केसरकरांना खटकले

हेही वाचा-Deepak Kesarkar on Kirit Somaiyas Statement : भाजपला दोष देणे योग्य नाही- दीपक केसरकरांनी स्पष्ट केली शिंदे गटाची भूमिका

हेही वाचा-आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीतील निवासस्थानावर दगडफेक

ABOUT THE AUTHOR

...view details