मुंबई- राज्य सरकारकडून इंधनावरील कर कपातीची घोषणा करण्यात आली आहे. पेट्रोलचे दरावरील व्हॅटमध्ये ५ रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर डिझेलवरील व्हॅटमध्ये ३ रुपयांची कपात करण्यात आली आहे. ही घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत केली आहे. नवे इंधन दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.
Petrol Diesel Rate in Maharashtra : राज्यात पेट्रोल ५ आणि डिझेल ३ रुपयांनी होणार स्वस्त- मंत्रिमंडळाचा निर्णय - fuel tax cut after cabinet meeting
मुंबई- राज्य सरकारकडून इंधनावरील कर कपातीची घोषणा करण्यात आली आहे. पेट्रोलवर ५ रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर डिझेलवर ३ रुपयांची कपात करण्यात आली आहे. ही घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत घेतला आहे.
पेट्रोल व डिझेलच्या दरातील कपातीमुळे राज्याच्या तिजोरीवर 6 हजार कोटींचा बोझा होणार आहे. हा राज्याच्या तिजोरीवर भार पडू देणार नाही. त्यासाठी तरतूद करू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर विश्वासदर्शक ठराव जिंकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतला. मात्र, तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला आहे. सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेने धाव घेत एकनाथ शिंदे यांच्या सरकार स्थापनेला आव्हान दिले आहे. आज दोन मंत्री असलेल्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय जाहीर केले आहे. बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदान, आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांना पुन्हा पेन्शन, बुलेट ट्रेन प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांकडून अंतिम मंजुरी, सरपंच, नगराध्यक्षांची थेट जनतेमधून निवड हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.