मुंबई : महाराष्ट्रात शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत ( Shinde-Fadnavis government in Maharashtra ) आल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला ( Accepted the post by Eknath Shinde ). आता सर्वांचे लक्ष मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लागले आहे. हा विस्तार ११ जुलैनंतरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ११ जुलैला सर्वोच्च न्यायालयात बंडखोर आमदारांच्या बाबत असलेल्या सुनावणीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार ( Expansion of the cabinet ) केला जाणार आहे. तरीसुद्धा या विस्ताराबाबत बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.
दोन टप्प्यांत होणार मंत्रिमंडळाचा विस्तार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील बहुतांश आमदार त्याचबरोबर मागच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेले शिवसेनेचे मंत्री हेसुद्धा मंत्री पदासाठी मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुक आहेत. त्याचबरोबर भाजपमध्येसुद्धा २०१४-१९ मध्ये भाजप शिवसेना युतीमध्ये असलेले मंत्री यंदा पुन्हा मंत्रीपदासाठी "आ" वासून आहेत. या कारणास्तव शिंदे-फडणवीीस सरकारमध्ये मंत्री पदासाठी जोरदार लॉबिंग सुरू झाली आहे. कोणाला मंत्रिपद मिळणार याची धाकधुक आमदारांमध्ये आहे.
21 जुलैनंतर दुसऱ्या टप्प्यातील मंत्र्यांना शपथ : मिळालेल्या माहितीनुसार खाते वाटपाचा फॉर्मुला जवळपास निश्चित झाला असून, दोन टप्प्यांमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळातील सर्व ४३ खात्यांच्या मंत्र्यांची यादी एकाच दिवशी जाहीर होणार नाही. १८ तारखेला राष्ट्रपती निवडणूक असल्याकारणाने त्यापूर्वी एक विस्तार होईल. यामध्ये काही मोजक्याच व महत्त्वाच्या मंत्र्यांना शपथ दिली जाईल. १८ जुलैला राष्ट्रपती निवडणूक असून २१ जुलैला मतमोजणी होणार आहे. म्हणून २१ जुलैनंतर दुसऱ्या टप्प्यात इतर मंत्र्यांना शपथ दिली जाईल.
मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास व सामान्य प्रशासन : शिंदे गटाचे सांगायचं झाले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खातं आणि सामान्य प्रशासन ही दोन्ही खाती राहण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे जी खाती होती त्यातील बहुतेक खाती ही भाजपकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेकडे जी खाती होती, ती शिंदे गटाकडे राहतील. शिंदे गटाला १२ ते १४ कॅबिनेट, राज्यमंत्रीपद मिळतील आणि भाजपकडे उर्वरित मंत्री पद असतील असे सांगितले जात आहे.