मुंबई -अभिनेत्री शिल्पा शेट्टी, तिची बहीण शमिता शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी यांच्या विरोधात 21 ( Fraud Case Register Against Shilpa Shetty ) लाख रुपये फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, याकरिता याचिका करण्यात आली होती. त्या याचिकेवर शुक्रवार रोजी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने तिघींनाही 28 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स जारी केला आहे. याप्रकरणामुळे शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ झाली आहे.
तिघींना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश -
बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी, तिची आई सुनंदा शेट्टी आणि बहीण शमिता शेट्टी यांनी परहड आमरा नामक व्यक्तींची 21 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी कारवाई करण्यात यावी, याकरिता न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने कारवाई सुरू केली आहे. शिल्पा शेट्टी त्यांच्या आई आणि बहिण शमिता शेट्टी तिघांना समन्स बजावले आहे. त्यांच्या विरोधात कलम 406, 420 आणि 34 अंतर्गत चौकशी होणार आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांनी शुक्रवारी हा आदेश जारी केला असून त्यांना २८ फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.