महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पोर्नोग्राफी केस : शिल्पा रडली आणि पतीसोबत भांडली, तपास अधिकाऱ्यांनी सांगितले! - शिल्पा शेट्टी

गुन्हे शाखेच्या पथकाने शिल्पाच्या घरावर धाड टाकल्यानंतर ती पती राज कुंद्रावर ओरडल्याचे सूत्रांनी सांगितले. "हे सर्व करायची गरज काय होती? हे तु का केले?" असे प्रश्न शिल्पाने पतीला विचारले. यावेळी दोघांमध्ये जोरदार वादही झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोर्नोग्राफी केस : शिल्पा आणि राज कुंद्रामध्ये झाले जोरदार भांडण, तपास अधिकाऱ्यांनी सांगितले!
पोर्नोग्राफी केस : शिल्पा आणि राज कुंद्रामध्ये झाले जोरदार भांडण, तपास अधिकाऱ्यांनी सांगितले!

By

Published : Jul 27, 2021, 12:14 PM IST

मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणी गुन्हे शाखेने घरावर धाड टाकल्यानंतर व्यावसायिक राज कुंद्रा आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे जोरदार भांडण झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी शिल्पाने अक्षरश: रडून तिला पतीच्या कृत्यांची माहिती नसल्याचे पोलिसांना सांगितल्याचे मुंबई पोलिसांतील सूत्रांनी म्हटले आहे.

तु हे का केले? शिल्पाचा पतीला सवाल

गुन्हे शाखेच्या पथकाने शिल्पाच्या घरावर धाड टाकल्यानंतर ती पती राज कुंद्रावर ओरडल्याचे सूत्रांनी सांगितले. "हे सर्व करायची गरज काय होती? हे तु का केले?" असे प्रश्न शिल्पाने पतीला विचारले. यावेळी दोघांमध्ये जोरदार वादही झाल्याचे सूत्रांनी सांगितले. चौकशीदरम्यान शिल्पा तपास अधिकाऱ्यांसमोर रडली आणि पतीने याबद्दल तिला अंधारात ठेवल्याचे सांगितले. याबद्दल तिला काहीच माहिती नव्हते असे शिल्पाने म्हटले आहे. या कृत्यामुळे कुटुंबाचे नाव बदनाम झाल्याचे शिल्पा यावेळी राज कुंद्राला म्हणाली.

आज संपणार पोलीस कोठडी

पोर्नोग्राफीक साहित्या अॅपच्या माध्यमातून प्रसारित करण्याच्या प्रकरणात राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने १९ जुलैच्या रात्री अटक केली होती. २० जुलैला कुंद्राला न्यायालयात दाखल केल्यानंतर त्याला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर कोठडीची मुदत 27 जुलैपर्यंत वाढवण्यात आली होती. आज (मंगळवार) राज कुंद्राच्या पोलीस कोठडीची मुदत संपणार आहे, तेव्हा त्याला पुन्हा कोर्टात हजर केले जाईल.

शिल्पाच्या PNB खात्यावर क्राईम ब्रँचला संशय

तपासादरम्यान मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाला शिल्पा आणि कुंद्राच्या जॉईंट अकाऊंटची माहिती मिळाली. पंजाब नॅशनल बँकेत (PNB) उघडलेल्या या खात्यात वर्षात कित्येक कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. क्राईम ब्रँचला असाही संशय आहे, की Hotshots App आणि Bolly Fame App कडून मिळालेली रक्कम शिल्पा-राजच्या या खात्यावर पाठविण्यात येत होती.तपासात याचीही माहिती मिळाली आहे, की या खात्यात डायरेक्ट ट्रांजेक्शन होत नव्हते. तर वेगवेगळ्या मार्गाने छोट्या-छोट्या रक्कमेने पैसे ट्रान्स्फर केले आहेत. याला टेक्निकली भाषेत प्लेसमेंट, लेअरिंग, इंटिग्रेशनची मोडस ऑपरेंडी म्हणतात. दरम्यान, 23 जुलैला जेव्हा गुन्हे शाखेच्या पथकाने शिल्पा शेट्टीच्या घरी छापा टाकला तेव्हा तिची या विषयीही चौकशी केली गेली.

राज कुंद्रांची अटक बेकायदेशीर-

वकीलराज कुंद्राचे वकील सुभाष जाधव म्हणाले, की 'माझ्या क्लायंटची अटक बेकायदेशीर आहे. कारण राज कुंद्रांच्या अॅपवरील कोणत्याही व्हिडिओला अश्लील म्हटले जाऊ शकत नाही. राज कुंद्रांविरोधात पोलिसांनी 4000 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. ज्यात कलम 67 अ अंतर्गत कोणताही अश्लील व्हिडिओ बनविला गेला आहे हे ते कुठेही सिद्ध करू शकत नाहीत. ज्या कलमांखाली राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे, त्यात त्यांना जामीन मिळतो'.

20 सप्टेंबरपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश

पॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडेला हायकोर्टाकडनं तूर्तास दिलासा दिला आहे. 20 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे मुंबई पोलिसांना निर्देश दिले आहेत. अटकेच्या भितीनं शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे या बोल्ड अभिनेत्रींची अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात धाव घेतली होती.

हेही वाचा -पोर्नोग्राफी प्रकरण: राज कुंद्रा यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी

ABOUT THE AUTHOR

...view details