मुंबई :खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शिवराळ भाषेत केलेल्या टीकेला शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. खासदार राऊत यांनी मुख्यमंत्र्यांबाबत ( Sheetal Mhatre Strongly Reply to Vinayak Raut ) आशा भाषेत बोलणे म्हणजे स्वतःची बौद्धिक पातळी दाखवून देण्याचा प्रयत्न असल्याचे मत शिंदे गटाचे प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी विनायक राऊत यांना जशाच तसे उत्तर ( Ground Under Vinayak Raut Feet has Shifted ) दिले आहे.
विनायक राऊत यांच्या पायाखालची जमीन सरकली :शीतल म्हात्रे यांनी म्हटले की, विनायक राऊत यांच्या पायाखालची जमीन सरकली असल्याने त्यांची जीभदेखील सरकली आहे. मुख्यमंत्री शिंदे हे सुशिक्षित आहेत. राज्याचा विकास मोठ्या सामर्थ्याने करीत आहेत. मात्र, विरोधकांकडे काही बोलायला नसल्यामुळे ते वैयक्तिक टीका करीत आहे. यातून त्यांची बौद्धिक पातळी किती आहे हेच सर्वसामान्य जनतेच्या समोर दिसत आहे असे देखील शितल मात्रे यांनी म्हटले आहे.