मुंबई/नवी दिल्ली - शीना बोरा हत्याकांडातील ( Sheena Bora Murder Case ) मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी सर्वोच्च न्यायालयातून जामीन देण्यात ( Indrani Mukherjee granted bail by Supreme Court) आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर 'त्या' विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. इंद्राणी मुखर्जी 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. तिची आज तुरुंगातून सुटका होणार आहे.
शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सुप्रीम कोर्टाने बुधवारी इंद्राणी मुखर्जीला तिची मुलगी शीना बोरा हिच्या हत्येचा आरोप असलेल्या खटल्यात जामीन मंजूर केला आहे. 6.5 वर्षांपासून इंद्राणी मुखर्जी ह्या कोठडीत आहेत, हा खटला लवकर पूर्ण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव, बीआर गवई आणि एएस बोपण्णा यांच्या खंडपीठाने नोव्हेंबर 2021 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळल्याच्या आदेशाविरुद्ध दाखल केलेल्या विशेष रजा याचिकेवर हा आदेश दिला. खंडपीठाने नमूद केले की, हा खटला परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित आहे आणि ५०% साक्षीदार जरी फिर्यादीने सोडले तरी खटला लवकर संपण्याची शक्यता नाही. या प्रकरणातील सहआरोपी इंद्राणी मुखर्जीचा पती पीटर मुखर्जी याला यापूर्वी जामीन मंजूर करण्यात आला होता, असेही खंडपीठाला सांगण्यात आले. पतीसोबत कट रचून स्वतःच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप तिच्यावर आहे.
याचिकाकर्त्यातर्फे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी युक्तीवाद केला. एप्रिल २०१२ मध्ये मुंबई पोलिसांत शीना बोराचे अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुश्री इंद्राणीच्या ड्रायव्हरला, ज्याला दुसऱ्या एका प्रकरणात अटक करण्यात आली होती, त्याने बोराची हत्या केल्याची कबुली दिली आणि मुंबई पोलिसांना कळवले की तिची आई, सुश्री इंद्राणीचा या हत्येत सहभाग होता. सीबीआयने 2015 मध्ये तपास हाती घेतला. तिला अटक करण्यात आली आणि त्याचप्रमाणे तिचे पती पीटर मुखर्जी यांना मार्च 2020 मध्ये विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.
कोण होती शीना बोरा? शीनाची हत्या का झाली? हे प्रकरण नेमके काय आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याआधी शीना बोरा कोण होती हे जाणून घेऊया. शीना बोरा ही टीव्ही इंडस्ट्रीमधील एक नावाजलेला चेहरा असलेल्या इंद्राणी मुखर्जी यांची मुलगी होती. इंद्राणी 'मीडिया टायकून' म्हणून ओळख असलेल्या पीटर मुखर्जी यांच्या पत्नी आहे. त्यामुळे शीना बोरा पीटर मुखर्जी यांची सावत्र मुलगी होती. एप्रिल 2012 मध्ये नवी मुंबईजवळील जंगलात 24 वर्षीय शीनाची कारमध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली.