मुंबई - संपूर्ण देशात रविवारी मोठ्या उत्साहात अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन सर्वत्र साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर बोरीवली पूर्व येथे कारगिल युद्ध विजेते आणि शौर्यचक्र प्राप्त सुभेदार मधुसूदन सुर्वे यांनी पारंपारिक वेशभूषेत ध्वजारोहन केला आहे. मुघल आणि इंग्रजांच्या इतिहासासह कारगिल युद्धाचा इतिहास पुस्तकात उतरवण्याची गरज आहे, असे मत मधुसूदन यांनी यावेळी व्यक्त केले.
मुघल आणि इंग्रजांच्या इतिहासासह कारगिल युद्धाचा इतिहास पुस्तकात उतरवण्याची गरज 'कारगिल युद्धाचा इतिहास पुस्तकात उतरवण्याची गरज'
यावेळी मधुसूजन यांनी सांगितले की, आपल्या देश आज 75 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. परंतु, आजची युवा पिढी ही देशासाठी शहिद झालेल्या जवानांचे बलिदान विसरत चालली आहे. आजची युवा पिढी ही देशासाठी शहिद झालेल्या जवानांचे बलिदान विसरत चालली आहे. सर्वांना आपण स्वातंत्र्य कसे झालो याचा जुना इतिहास पुस्तकात पाहायला मिळतो, परंतु, मुघल आणि इंग्रजांपासून आझादी मिळाल्यानंतर कारगिल सारख्या अनेक लढाया भारताने लढल्या आहेत आणि त्या जिंकल्याही आहेत. त्या इतिहासात उतरवण्याची गरज आहे. त्यामुळे सरकारने युवकांना कारगिलच्या बलिदान आणि शौर्यची यशोगाथा युवकांना माहिती व्हावी यासाठी त्याचा उल्लेख इतिहासात करणे गरजेचे आहे, असे मत यावेळी मधुसूधन यांनी मांडले.
हेही वाचा - अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा, 220 भारतीयांना घेऊन विमान दिल्लीत दाखल