महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कामगार नेते शशांक राव बनले जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष

आगामी निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात जेडीयूचा विस्तार करण्यासाठी शशांक राव यांना महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी नेमण्यात आल्याचे बोलले जात आहे. पालिका, बेस्ट, रिक्षा टॅक्सी आणि फेरीवाले यांसारख्या अनेक संघटनांचे राव अध्यक्ष आहेत.

कामगार नेते शशांक राव

By

Published : Feb 7, 2019, 1:11 PM IST

मुंबई- बेस्ट कामगारांचा ९ दिवस संप यशस्वी करुन दाखविल्यावर चर्चेत आलेले कामगार नेते शशांक राव यांची संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. शशांक राव यांनी जेडीयूमध्ये एप्रिल २०१७ मध्ये प्रवेश केला होता.

आगामी निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात जेडीयूचा विस्तार करण्यासाठी शशांक राव यांना महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी नेमण्यात आल्याचे बोलले जात आहे. पालिका, बेस्ट, रिक्षा टॅक्सी आणि फेरीवाले यांसारख्या अनेक संघटनांचे राव अध्यक्ष आहेत. त्यामुळे जेडीयूचा राज्यात विस्तार करण्यासाठी राव यांना पुढे केले आहे. बेस्ट संप काळात शिवसेनेच्या बेस्ट संघटनेने पहिल्याच दिवशी संपातून माघार घेतली होती. त्यानंतर सलग आठ दिवस राव यांनी शिवसेनेला टक्कर दिली होती. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वीच जेडीयूचे उपाध्यक्ष व राजनितीकार किशोर प्रशांत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यावरुन एकूणच राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

२०१७ला मी जेडीयूत प्रवेश केल्यावर मुंबईचे अध्यक्षपद भूषवले. समाजवादी विचारसरणीत माझी लहानपणापासून जडणघडण झाली आहे. यापुढे समाजवादी विचारसरणीच्या लोकांना एकत्र करुन जेडीयूचे राज्यातील स्थान मजबूत करण्यासाठी प्रयत्न करेल, अशी प्रतिक्रिया जेडीयूचे नवनिर्वाचित महाराष्ट्र अध्यक्ष शशांक राव यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details