मुंबई - गोरेगावच्या नेस्को मैदानात मनसेचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांची मनसे नेते पदी निवड करण्यात आली. यावर अमित यांच्या आई शर्मिला ठाकरे यांनी, या निवडीचा मला आनंद आहे. त्यांनी लोकांच्या समस्या लक्षात घेऊन काम करावे, अशा भावना व्यक्त केल्या.
मला आनंदच.. लोकांच्या समस्या लक्षात घेऊन अमित ठाकरेंनी काम करावे - News about Sharmila Thackeray
गोरेगावच्या नेस्को मैदानात मनसेचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाता अमित ठाकरे यांची मनसे नेते पदी निवड झाली. यावेळी त्यांच्या आई शर्मिला ठाकरे यांनी ते लोकांच्या समस्या लक्षात घेऊन काम करतील, अशी प्रतिक्रिया दिली.
लोकांच्या समस्या लक्षात घेऊन अमित ठाकरे काम करतील - शर्मीला ठाकरे
त्या पुढे म्हणाल्या, त्याच्याकडून महाराष्ट्राला खूप कामाची अपेक्षा आहे. विद्यार्थी, रेल्वे, कॉलेज, कुठेही काहीच व्यवस्थित नाहीत. त्यांनी लोकांच्या समस्या लक्षात घेऊन काम करावे, लोक त्याच्या मागे नक्की येतील. तरुण पिढीला काम करायची इच्छा असते, राज ठाकरे त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतील. या वेळी त्यांच्या आजींनी अमित ठाकरे याच्या निवडीचा आनंद झाल्याचे सांगितले. ते राज ठकरेंप्रमाणे काम करतील अशी प्रतिक्रिया दिली.