मुंबई- मनसेचे पहिले अधिवेशन गोरेगाव येथे सुरू आहे. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजमुद्रा असलेल्या नव्या भगव्या झेंड्याचे अनावरण केले. या राजमुद्रेप्रमाणे मनसे सर्व धर्मांना एकत्र येऊन यापुढे पक्ष नवीन वाटचाल करेल, अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी दिली आहे.
'मनसे सर्व धर्मांना एकत्रित घेत वाटचाल करेल' - mns raj thackeray
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यव्यापी महाअधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. गोरेगावच्या नेस्को मैदानात मनसेचे अधिवेशन सुरू आहे.
!['मनसे सर्व धर्मांना एकत्रित घेत वाटचाल करेल' sharmila thackeray](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5809965-thumbnail-3x2-d.jpg)
हेही वाचा -मनसेची 'शिवराजमुद्रा', राज ठाकरेंच्या हस्ते नव्या झेंड्याचे अनावरण
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यव्यापी महाअधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. गोरेगावच्या नेस्को मैदानात मनसेचे हे अधिवेशन सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मनसे आपला झेंडा बदलणार अशी चर्चा होती. अखेर या चर्चेवर आज पडदा पडला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले. तसेच राज्यभरातून आलेल्या मनसैनिकांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या.