मुंबईआशिया चषक 2022 IND vs PAK match मध्ये रविवारी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यात भारताने मिळवलेला दणदणीत विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही जल्लोष India vs Pakistan celebration Sharad Pawar केला. भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रोमांच उभा करणारा होता. या सामन्यात भारताने पाच गडी राखून पाकिस्तानवर विजय मिळवला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुप्रिया सुळे यांचा मुलगा विजय आणि मुलगी रेवती यांच्यासोबत या सामन्याचा आनंद शरद पवार यांनी लुटला. भारताचा संघ विजय होतात शरद पवार यांनी आपले दोन्ही हात वर करून जल्लोष केला. हा प्रसंग खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या कॅमेऱ्यात Supriya Sule India Pak match tweet टिपला आहे. हे विजयाचे सेलिब्रेशन असलेला फोटो सुप्रिया सुळे यांनी ट्विट केला आहे. रविवार आनंदी केल्याबद्दल भारतीय संघाचे सुप्रिया सुळे यांनी आभार मानले आहेत.
पराजयाचा वचपा काढलागेल्यावर्षी झालेल्या भारत आणि पाकिस्तान या सामन्यांमध्ये पाकिस्तानने दहा विकेटने सामना जिंकला होता. हा पराभव भारतीय संघाच्या आणि भारतीय क्रिकेट रसिकांच्या जीवावर घाव घालणारा होता. आजच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला नमून विजय मिळवत त्या पराजयाचा वचपा काढला. पाकिस्तान क्रिकेट संघावर भारतीय क्रिकेट संघाने मिळवलेल्या विजयानंतर संपूर्ण देशात सेलिब्रेशन झालेलं पाहायला मिळत आहे. पाकिस्तानने 20 षटकात 148 धावांचा आव्हान भारतीय संघासमोर ठेवले होते. भारतीय संघाने 19.4 षटकात हे आव्हान पार करत पाकिस्तान संघाचा पराभव केला.
आशिया चषकात 14 वेळा भारत-पाकिस्तान IND vs PAK आमनेसामनेभारत पाकिस्तान आतापर्यंत आशिया चषकात 14 वेळा आमनेसामने 14 times India Pak meet in Asia Cup आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक 8 सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवता आला आहे. त्याचबरोबर पाकिस्तान संघाला 5 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच दोन्ही संघातील 1 सामना अनिर्णीत राहिला आहे. तसेच आशिया चषकावर नाव कोरण्यात देखील भारतीय संघ पुढे आहे. आतापर्यंत भारताने 7 वेळा आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे. त्याचबरोबर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाने दोनवेळा आशिया चषक जिंकला आहे. त्याचबरोबर श्रीलंका संघाने 5 वेळा आशिया चषक पटकावला आहे.
हेही वाचाAsia Cup 2022 IND vs PAK भारत-पाक आज महामुकाबला, सामन्याबद्धल जाणून घ्या सर्वकाही