महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sharad Pawar :राष्ट्रवादीच्या आमदारांची आणि पदाधिकाऱ्यांची उद्या शरद पवार घेणार बैठक - Pawar will hold a meeting of NCP MLAs and office bearers

राज्यात सुरू असलेल्या राजकीय संग्रामाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (President of the Nationalist Congress) शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आणि पदाधिकाऱ्यांची उद्या (12 जुलै) मंगळवार रोजी बैठक बोलावली आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर इथे ही बैठक होणार आहे. या बैठकीत मतदार संघातील आमदारांचे कार्य, शिवसेना याचिकेवर न्यायालयाचा निर्णय, राष्ट्रपती पदाची निवडणुक या विषयांवर चर्चा होणार असल्याची शक्यता आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar

By

Published : Jul 11, 2022, 4:14 PM IST

मुंबई :राज्यात सुरू असलेल्या राजकीय संग्रामाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (President of the Nationalist Congress) शरद पवार ( Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आणि पदाधिकाऱ्यांची 12 जुलै मंगळवार रोजी बैठक बोलावली आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर इथे ही बैठक होणार असून, उद्या (12 जुलै) पुन्हा एकदा आपल्या सर्व आमदारांची शरद पवार बैठक घेणार आहेत.

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर देखील आपल्या पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक शरद पवारांनी घेतली होती. बैठकीच्या माध्यमातून आपल्या आमदारांची मतं शरद पवार यांनी ऐकली. तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत राज्यामध्ये अस्तित्वात आलेलं शिंदे सरकार पाहता, कधीही मध्यवर्ती निवडणुका होऊ शकतील. त्यामुळे आपल्या मतदारसंघात जाऊन आमदारांनी कामासाठी सुरुवात करावी. अशा सूचनाही शरद पवार यांनी दिला होत्या. त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा उद्या 12 जुलैला शरद पवार यांनी ही बैठक बोलावली आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेने केलेल्या याचिकेवर सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईची चर्चा देखील या बैठकीत होण्याची शक्यता आहे.



चर्चा राष्ट्रपती निवडणुकीबाबत : 18 जुलैला राष्ट्रपती निवडणूक पार पडणार आहे. यावेळी यशवंत सिन्हा हे विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानासाठी देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:Shiv Sena Rebel MLA Santosh Bangar : मीच शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे आणि राहणार - संतोष बांगर

ABOUT THE AUTHOR

...view details