महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Koregaon Bhima Commission : कोरेगाव-भीमा चौकशी आयोगासमोर साक्ष नोंदवण्यासाठी शरद पवार सह्याद्रीवर

पुण्यातील कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2018 रोजी हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात दोन समाजातील गटांमध्ये हाणामारी झाली असून या घटनेत एकाचा मृत्यू तर काही जण जखमी झाले होते. या घटनेनंतर जवळपास 165 लोकांवर पुणे पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले. यातील न्यायालयीन चौकशी आयोगासमोर हजर राहण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत.

By

Published : May 5, 2022, 6:36 AM IST

Updated : May 5, 2022, 11:11 AM IST

शरद पवार
शरद पवार

मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सकाळी सह्याद्री अतिथीगृहात कोरेगाव भीमा चौकशी आयोगा समोर ( Koregaon Bhima Commission ) आपली साक्ष नोंदवणार आहेत. निवृत्त न्यायाधीश जय नारायण पटेल आणि मुख्य माहिती आयुक्त सुमित मलिक यांच्या द्विसदस्यीय आयोगासमोर शरद पवार यांची चौकशी होणार आहे. 23 आणि 24 फेब्रुवारी 2022 ला चौकशी आयोगासमोर हजर राहण्याच्या सूचना शरद पवार यांना देण्यात आल्या होत्या. मात्र आपल्याला या प्रकरणांमध्ये अतिरिक्त प्रतिज्ञापत्र द्यायचे असल्याचे शरद पवार यांच्याकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे आता पवार यांची 5 आणि 6 मे ला चौकशी आयोगाकडून त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी शरद पवार मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत.

पुण्यातील कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2018 रोजी हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात दोन समाजातील गटांमध्ये हाणामारी झाली असून या घटनेत एकाचा मृत्यू तर काही जण जखमी झाले होते. या घटनेनंतर जवळपास 165 लोकांवर पुणे पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले. त्यावेळी असलेल्या तात्कालिक देवेंद्र फडणीस सरकारच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत शरद पवार यांनी पुणे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. एल्गार परिषदेकडून चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे हिंसाचार झाला असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या प्रकरणात 18 सप्टेंबर 2018 ला शरद पवार यांच्याकडून पहिले प्रतिज्ञापत्र सादर झाला असून 11 एप्रिल 2022 ला दुसरा प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडून सादर करण्यात आला आहे.

हेही वाचा -Dilip Walse Patil on Law and order : कोणतीही परिस्थिती हाताळण्यास पोलीस सक्षम - दिलीप वळसे पाटील

Last Updated : May 5, 2022, 11:11 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details