मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी सपत्निक मुंबईमधील जे. जे. रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस टोचून घेतली. आज दुपारी तीनच्या सुमारास पवारांनी रुग्णालयामध्ये येऊन लस घेतली. आजपासून देशात करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला असून त्याअंतर्गत ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
शरद पवार यांच्यासोबत त्यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यादेखील रुग्णालयात आल्या होत्या. याशिवाय, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहानेही यावेळी उपस्थित होते. प्राथमिक तपासणी झाल्यानंतर शरद पवार यांना सिरमची कोव्हिशिल्ड लस टोचण्यात आली. आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोनाची लस घेतली होती.
महाराष्ट्रातील पहिलेच मोठे राजकीय नेते -
शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले आहेत. देशात आजपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. या टप्प्यात 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. तसेच गंभीर आजारांशी लढा देणाऱ्या 45 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना कोरोना लस दिली जात आहे. भारतात भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड या लसी देण्यात येत आहेत.
शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांनी सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस घेतली. त्यानंतर त्यांना 30 मिनिटे निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होतं. दुसरी लस 28 दिवसांनी दिली जाईल. त्यांची प्रकृती पुर्णपणे ठीक आहे', अशी माहिती वैद्यकीय संचालक, डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.
पवारांना 'सीरम'ची 'कोव्हीशिल्ड' लस टोचण्यात आली -
जे.जे.रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने देखील पवारांसोबत उपस्थित होते. तात्याराव लहाने यांनी शरद पवार यांच्या लसीकरना वेळी उपस्थित राहून त्यांनी लसीकरण केलं.आज सकाळीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन कोरोना लस टोचून घेतली. त्यानंतर आता शरद पवार यांनीही पुढाकार घेऊन मुंबईत जे.जे.रुग्णालयात कोरोना लस घेण्यासाठी उपस्थिती लावली आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पवार यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर पवारांना 'सीरम'ची 'कोव्हीशिल्ड' लस टोचण्यात आली.