मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 1988 ते 1996 दरम्यान त्यांनी केलेल्या भाषणांपैकी निवडक 61 भाषणांचे 'नेमकचि बोलणें' हे पुस्तक शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ( Sharad Pawar birthday ) प्रकाशित करण्यात ( Sharad Pawar Speech Book Published ) आले. लेखक सुधीर भोंगळे यांनी शरद पवार यांच्या सर्व भाषणात आपल्याकडे संग्रहित करून ठेवली आहेत. त्या भाषणांपैकी 61 भाषणांचा पहिला खंड प्रकाशित करण्यात आला आहे. साहित्यिक रंगनाथ पठारे आणि खासदार संजय राऊत यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
पवारांनी दिलखुलासपणे दिले उत्तरे -
या कार्यक्रमाला शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक उपस्थित होते. मुंबईतील नेहरू सेंटर येथे हा कार्यक्रम पार पडला. असून, या पुस्तकातील काही भाषणे साहित्यिक तसेच कलाक्षेत्रातील लोकांनी वाचून दाखवली. यावेळी वाचून दाखवलेल्या प्रत्येक भाषणाचा संदर्भ शरद पवार यांनी सांगितला. तसेच वाचून दाखवलेला भाषणानंतर शरद पवार यांना वाचक श्रोत्यांनी प्रश्नही विचारले. त्या प्रश्नांना तेवढ्यात दिलखुलासपणे शरद पवार यांनी उत्तरही दिले.
तुम्ही प्रत्येकांची नावे लक्षात कसे ठेवता?
तुम्ही प्रत्येकांची नावे लक्षात कशी ठेवता? हा प्रश्न कवी किशोर कदम यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारला. त्यावेळी शरद पवार यांनी त्यांना उत्तर देतांना सांगितले की, राजकारणात कमी कष्टात यश मिळते जर तुम्ही प्रत्येकाचे नाव लक्षात ठेवले तर. मुख्यमंत्री असताना एक महिला भेटायला आली त्यावेळी मी त्यांना कुसुम अशी नावाने हाक मारली. सायबाने मला हाक मारली हे लोकांना आवडते. या लहान गोष्टी जाणीव पूर्वक लक्षात ठेवल्या पाहिजेत. यशवंतराव चव्हाण आणि वसंत दादा पाटील यांनाही या गुणामुळे समाजात कायमस्वरूपाचे स्थान प्राप्त करण्यात यश मिळाले.