मुंबई - राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी बुधवारी 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेसंदर्भातील ( Sharad Pawar Speak About Ajit Pawar Oath ) अनेक खुलासे केले आहेत. मुंबईत आयोजित ( Sharad Pawar Mumbai Program ) एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलतांना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात सत्ता ( Modi Offer To NCP For Government Formation ) स्थापनेची ऑफर दिली होती, असाही खुलासा केला. तसेच अजित पवारांच्या सकाळच्या शपथ विधीवरही त्यांनी भाष्य केले.
काय म्हणाले शरद पवार? -
गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी त्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारवर अनेक शाब्दीक हल्ले केले. त्यामुळे मनमोहन सिंग सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. मात्र, राज्याच्या विकामाच्या आड सुडाचे राजकारण येऊ नये, असे मत मी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे व्यक्त केले होते. ते मनमोहन सिंग यांनीही मान्य केले. मोदींशी संवाद साधण्यासाठी माझ्याशिवाय कोणीही इच्छूक नव्हते. काँग्रेसमधील अनेकांनी मोदींविरोधात टोकाची भूमिका घेतली होती, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.