मुंबई -मुंबई बॉम्ब ब्लास्ट प्रकरणातील आरोपींकडून जमिनीचे व्यवहार केल्याप्रकरणी मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले ( ED Take Custody Nawab Malik ) आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये नवाब मलिक दोषी असून, जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही. तोपर्यंत नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी किरीट सोमैया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे केली आहे. तसेच, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडेही मलिकांच्या राजीनाम्याची मागणी ( Sharad Pawar Should Resign Malik ) सोमैयांनी केली आहे.
किरीट सोमैया यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची आज राजभवन येथे भेट घेतली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. किरीट सोमैया म्हणाले, एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या कोर्लई गावात 19 बंगले असल्याचा दावा करत त्याची घरपट्टी भरतात. तर दुसरीकडे आता हे बंगले अस्तित्वात नाही, असे सांगितले जाते. मग हा पाच कोटीचा भ्रष्टाचार कोणी केला. ही संपत्ती कुठून आली. या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे, सत्य जनतेसमोर आले पाहिजे, अशी विनंती किरीट सोमैया यांनी भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे.