महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sharad Pawar Replied To Raj Thackeray : '...म्हणून शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेतो', शरद पवारांचे प्रत्युत्तर - शरद पवार राज ठाकरे टीका

शरद पवार ( Sharad Pawar ) हे शाहू, फुले, आंबेडकर यांची नावे घेतात. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी ठाण्यातील उत्तर सभेत केली होती. राज ठाकरे यांच्या या टीकेला शरद पवार यांनी नाव ( Sharad Pawar Replied To Raj Thackeray ) न घेता उत्तर दिले आहे.

Sharad Pawar Replied To Raj Thackeray
Sharad Pawar Replied To Raj Thackeray

By

Published : Apr 30, 2022, 3:00 PM IST

Updated : Apr 30, 2022, 10:04 PM IST

मुंबई - शरद पवार ( Sharad Pawar ) हे शाहू, फुले, आंबेडकर यांची नावे घेतात. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी ठाण्यातील उत्तर सभेत केली होती. राज ठाकरे यांच्या या टीकेला शरद पवार यांनी नाव ( Sharad Pawar Replied To Raj Thackeray ) न घेता उत्तर दिले आहे. शाहू महाराज, महात्मा फुले यांनी शिक्षणाची दारे उघडी केली. ज्ञान विज्ञान पुढे आणले. तसेच महात्मा फुले दृष्टी असलेले नेते होते, असे शरद पवार म्हणाले. यशवंतराव चव्हाण येथे भटके-विमुक्त बहुजन समाजाकडून कृतज्ञता गौरव सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मंत्री जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.

मागण्या सोडवणार -पंचायतराज राज्याची निर्मिती वसंतराव नाईक यांनी करून दिली. आज भटक्या-विमुक्त समाजातील तरुण सुविधांपासून वंचित आहे. या वर्गाचा विकास व्हायला हवा होता. संघटन करायला हवे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. तसेच आज भटक्या-विमुक्त समाजाने 28 मागण्या मांडल्या आहेत. एकाच वेळी सध्या मान्य होतील, असे नाही. मात्र, या सर्व मागण्यांची विभागणी करून महत्त्वाच्या मागण्या मान्य करण्यासाठी राज्य मंडळातील संबंधित मंत्र्यांसोबत बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे पवार म्हणाले.

दूरदृष्टी असणारे व्यक्तिमत्त्व -शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नाव घेतात, अशी टीका एका नेत्याने माझ्यावर केली. महात्मा फुले आणि शिक्षणाची दारे उघडी केली, ज्ञान-विज्ञान पुढे आणले, महात्मा फुले यांनी इंग्रजांना दिलेल्या निवेदन पत्राचा दाखला पवार यांनी दिला. महात्मा फुले हे दूरदृष्टी असलेले नेते होते मग त्यांचे नाव घ्यायचे नाही तर कोणाचे घ्यायचे असं सांगत राज ठाकरेंना फटकारले. सर्वसामान्यांचा विचार करणारे शाहू महाराज होते. आधुनिकतेचा विचार करणारे शाहू महाराज होते, त्यामुळे त्यांचा नाव घ्यायचं नाही का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाबरोबरच जलसंपदा मंत्री असताना धरण बांधून देशात वीज निर्मितीचे काम केले. केवळ वीज निर्मिती केली नाही, तर ती गावापर्यंत पोहोचवली. भारतात अनेक जातीचे लोक एकत्र राहत आहेत. हे बाबासाहेबांच्या घटनेमुळे. याचमुळे आपण शाहु, फुले, आंबेडकरांचे नाव घेतो. इतर कोणाचे नाव घेण्याची गरज नाही, अशी टीका शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर केली.

शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराने मार्ग काढू -देशात महागाई बेरोजगारी हा मूलभूत प्रश्न आहे. परंतु आज वेगळ्या मागण्या केल्या जात आहेत. आज केवळ कोण सभा घेतो, याची चर्चा सुरू आहे. अशा चर्चेतून महागाई बेरोजगारी सुटणार नाही. देशात धार्मिक मुद्द्याच्या आधारे राजकारण सुरू आहे. धार्मिक मुद्दा पुढे करणाऱ्या वर्गाकडे लेखणी अधिक आहे. त्यामुळे धार्मिक वादात गुंतवून, महागाई बेरोजगार प्रश्न बदलण्यासाठी आणि आपला स्वार्थ साधण्यासाठी काही जण प्रयत्न करत आहेत. मात्र, यात न अडकता, शाहू महाराज, फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचाराने आपण त्यावर मार्ग काढू शकतो, असे मत पवार यांनी व्यक्त केले.

हेही वाचा -Mumbai Street Food : रमजानिमित्त मोहम्मद अली मार्गावर भरली आहे खाद्यजत्रा, पाहा VIDEO

Last Updated : Apr 30, 2022, 10:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details