मुंबई - राज्यातील महाविकास आघाडी सरकार कितीही संकटे आली तरी नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून उभे असल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. बीडचे माजी खासदार आणि भाजपचे नेते जयसिंगराव गायकवाड यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी पवार बोलत होते.
यावेळी बोलताना देशात सत्ता नसताना राज्यात सरकार चालवणे सोपे नसते. देशभरात वेगळे राजकीय चित्र असताना राज्यात संकट आली, अतिवृष्टी झाली, इतर संकटेही आली. मात्र, त्या सर्व संकटांवर मात करून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहे, असे पवार म्हणाले. रोगराईचे मोठे संकट देशावर आहे. कोरोनामुळे अनेक मर्यादा आहेत. मात्र, त्यामधून बाहेर पडू, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. यावेळी जयसिंगराव गायकवाड पुन्हा राष्ट्रवादीत आल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला नक्की होईल, असेही पवार म्हणाले.
- मराठवाड्याचा विकास करूया -
उद्या यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी आहे. त्यांनी बेरजेचे राजकारण केले. तेच काम शरद पवार यांनी केले. मध्ये एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला, आता जयसिंगराव यांनी प्रवेश केला. जयसिंगराव यांनी राज्यात आणि केंद्रात मंत्रिपद भूषवली आहेत. त्यांच्यामुळे राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढणार आहे. 26/11 च्या हल्ल्यावेळी 48 तास ताज हॉटेलमध्ये अडकले होते, असे प्रसंग त्यांच्या सोबत होऊन गेले पण ते डगमगले नाहीत. त्यांनी योग्य असेच निर्णय घेतले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे, आम्ही तुम्हाला साथ देऊ कोणतीही अडचण येऊ देणार नाही. मराठवाड्याचा विकास करूया, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.
- भाजपला हद्दपार करूया -