महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा हा क्रुर प्रकार; शरद पवारांकडून लखीमपूर घटनेचा तीव्र निषेध - शरद पवारांकडून निषेध

लखीमपुर येथील घटना अत्यंत निषेधार्ह आहे. मी माझ्या प्रत्येक भाषणात सांगतो की, सत्तेत बसलेल्या लोकांना शेतकऱ्यांप्रती द्वेष आहे. आज त्याची पुन्हा प्रचिती आली. सत्तेच्या नशेला जाब विचारण्याची ही वेळ आहे, असे ट्वीट करत जयंत पाटील यांनी केले.

शरद पवारांकडून निषेध
शरद पवारांकडून निषेध

By

Published : Oct 4, 2021, 12:52 AM IST

Updated : Oct 4, 2021, 7:41 AM IST

मुंबई - उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून कडाडून निषेध करण्यात आला आहे. पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी हा शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा क्रुर प्रकार असल्याचे म्हटले आहे. शरद पवार यांनी ट्विट करून या घटनेबाबत निषेध नोंदवला आहे. तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आपला निषेध नोंदवला आहे.

शरद पवार यांनी ट्विट करून या घटनेबाबत निषेध नोंदवला

लखीमपुर येथील घटना अत्यंत निषेधार्ह आहे. मी माझ्या प्रत्येक भाषणात सांगतो की, सत्तेत बसलेल्या लोकांना शेतकऱ्यांप्रती द्वेष आहे. आज त्याची पुन्हा प्रचिती आली. सत्तेच्या नशेला जाब विचारण्याची ही वेळ आहे, असे ट्वीट करत जयंत पाटील यांनी या घटनेत शहीद झालेल्या शेतकरी बांधवांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी देखील लखीमपूर येथील घटनेचा निषेध केला आहे. तसेच केंद्रात असलेला भाजप सरकारमधील मंत्री आणि त्या मंत्र्यांचा मुलगा या घटनेसाठी कारणीभूत असल्याचं आरोप नवाब मालिकांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.

Last Updated : Oct 4, 2021, 7:41 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details