महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'जनतेने युतीला कौल दिलाय, आम्ही विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी पार पाडू' - politics news

राज्यात अतिवृष्टीने शेतकऱयांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर शेतकऱयांना मदत करावी, तसेच विमा कंपन्यांनी देखील शेतकऱयांचा अंत न पाहत शेतकऱयांना मदत करण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.

शरद पवार

By

Published : Nov 6, 2019, 1:16 PM IST

मुंबई- जनतेने भाजप - शिवसेना युतीला कौल दिला आहे. त्यामुळे त्यांनी सरकार स्थापन करावे, आम्ही जबाबदार विरोधी पक्षनेते म्हणून काम करू असे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केले आहे. तसेच आगामी राज्यसभेच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने संजय राऊत यांच्यासोबत चर्चा झाली असून राऊतांनी कुठलाही प्रस्ताव दिला नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत दिल्लीत झालेल्या पोलिसांच्या हल्ल्याला केंद्र सरकारच जबाबदार असल्याचे सांगितले आहे. तसेच लवकरच आयोध्या प्रकरणी निकाल येण्याची शक्यता आहे, त्यामुळे देशात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घेत शांतता राखण्याचे आवाहनही यावेळी पवारांनी केले आहे.

राज्यात अतिवृष्टीने शेतकऱयांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर शेतकऱयांना मदत करावी, तसेच विमा कंपन्यांनी देखील शेतकऱयांचा अंत न पाहत शेतकऱयांना मदत करण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details