मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुंबईतील घरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम करत आहेत. त्यांना पित्ताशयाचा त्रास जाणवत होता, त्यामुळे गेल्या महिन्यात त्यांच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. मुंबईतील ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यानंतर त्यांच्यावर तोंडाच्या अल्सरची देखील शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियांनंतर शरद पवार हे आपल्या मुंबईतील घरीच आराम करत होते.
शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच शरद पवारांचा सुप्रिया सुळेंसोबत फेरफटका - Sharad Pawar News Update
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुंबईतील घरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम करत आहेत. त्यांना पित्ताशयाचा त्रास जाणवत होता, त्यामुळे गेल्या महिन्यात त्यांच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी प्रथमच आज सुप्रिया सुळेंसोबत मुंबईचा फेरफटका मारला.
शरद पवारांना घेऊन सुप्रिया सुळेंचा फेरफटका
मात्र आज सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांना घेऊन गाडीतून मुंबईचा फेरफटका मारला आहे. फेरफटका मारत असताना बाप लेकीमध्ये जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या गप्पाही रंगल्या. मुंबईत नवीन राहायला आल्यानंतर आपन कशा पद्धतीने फिरायला जात असत, याबाबतच्या जुन्या आठवणींना शरद पवार यांनी उजळा दिला. यावेळी सुप्रिया सुळे या ड्रायव्हिंग करत होत्या. दरम्यान शरद पवार हे त्यांच्यावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच घराबाहेर पडले आहेत.