महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Budget Session : अधिवेशनात राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनी आणि आमदारांनी उपस्थित राहावे; शरद पवारांचे आदेश

अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्री तसेच आमदारांनी उपस्थित रहावे, असे आदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज आपल्या सर्व मंत्री आणि आमदारांना दिले असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सांगितले आहे. याबाबत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवार यांनी बैठक बोलावली होती.

sharad pawar
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

By

Published : Mar 2, 2022, 3:13 PM IST

Updated : Mar 2, 2022, 4:47 PM IST

मुंबई - उद्यापासून सुरू होणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्री तसेच आमदारांनी उपस्थित रहावे, असे आदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज आपल्या सर्व मंत्री आणि आमदारांना दिले असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सांगितले आहे. याबाबत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवार यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिली. या बैठकीला अर्थमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार सुनील तटकरे यांच्यासहित इतर नेत्यांची उपस्थिती बैठकीला होती.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

पक्ष नवाब मलिक यांच्या पाठीशी -

ईडीकडून मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली असली तरी, पक्ष पूर्णपणे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. तसेच त्यांच्या प्रकरणांमध्ये कायदेशीर बाबी तपासण्यासाठी त्यांचे वकील आणि कुटुंबांकडून पूर्ण तयारी सुरू असल्याचे देखील यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. सध्या नवाब मलिक हे ईडी कोठडीत असून, 3 मार्चपर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावली आहे.

मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना परत आणणे आवश्यक -

युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जवळपास वीस हजार भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. आता भारत सरकारकडून रोज 250 विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणले जात आहे. मात्र अडीचशे विद्यार्थ्यांना रोज मायदेशी परत आणणे पुरेसे नाही. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना भारतात परत आणणे गरजेचे आहे. युक्रेनची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत असल्याने याबाबत भारत सरकारने लवकरात लवकर पावले उचलणे गरजेचे आहे. युक्रेनमध्ये कडाक्याची थंडी असून अशा वातावरणात विद्यार्थ्यांना खायला देखील मिळत नाही अशी परिस्थिती झाली आहे. याआधी ज्यावेळेस युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारतीय अडकले होते, त्यावेळेस तत्कालीन सरकारने शेकडोंच्या संख्येने भारतीयांना परत आणले होते. त्याच पद्धतीने आता मोदी सरकारने देखील पावले उचलणे गरजेचे असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले.

Last Updated : Mar 2, 2022, 4:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details