महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sharad Pawar on Nawab Malik : 'सरकार विरोधात जाहीर भूमिका मांडणाऱ्यांना त्रास दिला जातोय' - शरद पवार नवाब मलिक

आम्हाला खात्री होती की नवाब मलिकांना अशाप्रकारे त्रास दिला जाईल, याची कल्पना होतीच अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी नवाब मलिकांच्या चौकशीबद्दल केली आहे. जे जाहीरपणे आपली भूमिका घेते त्यांना त्रास दिला जातो. कोणत्या प्रकरणात मलिकांची चौकशी सुरू आहे हेही माहिती नाही. काहीही झाले तरी दाऊदचे नाव घ्यायचे आणि नोटीस पाठवायचे असे प्रकार सध्या सुरू आहे, असेही ते म्हणाले.

Sharad Pawar on Nawab Malik
Sharad Pawar on Nawab Malik

By

Published : Feb 23, 2022, 11:00 AM IST

Updated : Feb 23, 2022, 11:53 AM IST

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी घेऊन गेल्याने महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रीय काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील ईडी आणि केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. मुंबईत प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

आम्हाला खात्री होती

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना पहाटे पाच वाजता ईडी कार्यालयात नेऊन चौकशी सुरू केली आहे. अचानक झालेल्या ईडीच्या कार्यवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावरून केंद्र सरकारला टीकेचे लक्ष्य बनवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील ईडीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. नवाब मलिक ज्या पद्धतीने केंद्र सरकार विरोधात भूमिक मांडत होते, त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यवाहीची आम्हाला खात्री होती. परंतु, ईडीने आता कोणती केस काढली याबाबत माहिती नाही, असेही पवार म्हणाले.

...हा तर सत्तेचा गैरवापर

कोणत्याही प्रकरणाचा संबंध जोडायचा, नोटीस पाठवायची आणि चौकशीच्या नावाने लोकांना बदनाम करायचं, त्रास द्यायचा असे उद्योग महाराष्ट्र केंद्र सरकार कडून सुरू आहेत. हा सत्तेचा गैरवापर आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली. केंद्र सरकार विरोधात उघड भूमिका मांडतात त्यांच्यावरच कारवाई होतेय, असेही पवार म्हणाले.

Last Updated : Feb 23, 2022, 11:53 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details